२०२०-०९-०४

गीतानुवाद-१५५: झूम बराबर झूम शराबी

मूळ हिंदी गीतकारः नाझ शोलपुरी, संगीतः अझिज नाजाँ, गायकः अझिज नाजाँ
चित्रपटः फाईव्ह रायफल्स, सालः १९७४, भूमिकाः .एस.जोहर 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२००३२१

प्रस्ताव

ना हरम में, ना सुकूँ मिलता है बुतखाने में
चैन मिलता है तो साक़ी तेरे मैखाने में

अंतःपुरी, सौख्य मिळते मंदिरातही जे
ते सौख्य कलाला, तुझ्या मद्यगृही बघ मिळते

॥धृ॥

झूम, झूम, झूम, झूम
झूम बराबर झूम शराबी झूम बराबर झूम

झिंग झिंग, झिंग झिंग
झिंग बरोबर, झिंग मद्यप्या, झिंग बरोबर झिंग

॥१॥

काली घटा है, , मस्त फ़ज़ा है,
काली घटा है मस्त फ़ज़ा है
जाम उठाकर घूम घूम घूम
आज अँगूर की बेटी से मुहौब्बत कर ले
शेख साहब की नसीहत से बग़ावत कर ले
इसकी बेटी ने उठा रखी है सर पर दुनिया
ये तो अच्छा हुआ के अँगूर को बेटा ना हुआ
कमसे कम सूरत--साक़ी का नज़ारा कर ले
आके मैख़ाने में जीने का सहारा कर ले
आँख मिलते ही जवानी का मज़ा आयेगा
तुझको अँगूर के पानी का मज़ा आयेगा
हर नज़र अपनी बसद शौक़ गुलाबी कर दे
इतनी पीले के ज़माने को शराबी कर दे
जाम जब सामने आये तो मुकरना कैसा
बात जब पीने की आजाये तो डरना कैसा
धूम मची है, , मैख़ाने में,
धूम मची है मैख़ाने में
तू भी मचा ले धूम धूम धूम

काळी रात्र आहे , मस्त बहार आहे,
काळी रात्र आहे, मस्त बहार आहे
उचल पेला अन् फिर गिर गिर
आज द्राक्षाच्या कन्येवर तू प्रेम घे करून
शेख साहेबांच्या शिकवणीशी काडी घे मोडून
ह्याच्या कन्येने घेतली आहे शिरी दुनियेला
हे तर झाले बरे द्राक्षाला मुलगा झाला
कमीत कमी चेहर्याचे दर्शन घे कलालाच्या तू
येऊनी मद्यगृही दे आधार जीवनाला तू
नजरभेटीतच यौवनाची येईल बघ मजा
तुला द्राक्षाच्या रसाचीही येईल बघ मजा
हर कटाक्षास स्वतःच्याही गुलाबी कर तू
एवढी पी तू, सारे जगच मद्यपी कर तू
पेला येताच समोर, का उगा आढे वेढे
गोष्ट रसपानाची येता कशा म्हणून भ्यावे
धूम उसळली , मद्यगृही
धूम उसळली मद्यगृही
तू ही करून घे धूम धूम धूम

॥२॥

इसके पीनेसे तबीयत में रवानी आये
इसको बूढा भी जो पीले तो जवानी आये
पीने वाले तुझे आजाएगा पीने का मज़ा
इसके हर घूँट में पोशीदा है जीने का मज़ा
बात तो जब है के तू मै का परस्तार बने
तू नज़र डाल दे जिस पर वोही मैख़्वार बने
मौसम--गुल में तो पीने का मज़ा आता है
पीने वालों को ही जीने का मज़ा आता है
जाम उठाले, , मुँह से लगाले,
जाम उठाले, मुँह से लगाले
मुँह से लगाकर चूम चूम चूम

ह्या रसपानाने वृत्ती सार्या होती तल्लख
म्हातार्यानेही पिताच त्याला येतसे यौवन
पिणार्या रे तुला येईल पिण्याचीही मजा
ह्याच्या हर घोटातच साठवली जीवनाची मजा
यश तर तेव्हाच आहे जेव्हा तू आधीन होशील
दृष्टी टाकशील ज्यावर ते लगेच रसमय होईल
वसंत ऋतूत येतसे मजा पिण्याचीही
पिणार्यालाच येतसे मजा जगण्याचीही
पेला उचल, , तोंडाला लाव
पेला उचल, तोंडाला लाव
तोंडाला लावून चुंब चुंब चुंब

॥३॥

जो भी आता है यहाँ पीके मचल जाता है
जब नज़र साक़ी की पड़ती है सम्भल जाता है
इधर झूमके साक़ी का लेके नाम उठा
देख वो अब्र उठा तू भी ज़रा जाम उठा
इस क़दर पीले के रग-रग में सुरूर आजाये
कसरत मै से तेरे चेहरे पे नूर आजाये
इसके हर कतरे में नाज़ाँ है निहाँ दरियादिली
इसके पीनेसे पता होती है के ज़िन्दादिली
शान से पीले, , शान से जीले,
शान से पीले शान से जीले
घूम नशे में घूम घूम घूम

जो येतो इथे, पिऊन गुंगून जातो
दृष्टी कलालाची पडताच आणि सावरतो
ये इथे रंगूनी घेऊन कलालाचे नाव
सोड संकोच तू उचल पेला आणि मुखाला लाव
पी असे की चेतना नसानसात स्फुरो
ऊर्मीने द्राक्ष रसाच्या चेहरा उजळो
ह्याच्या हर थेंबात आहे सूप्तसा उदात्तपणा
हा पिण्याने सचेतनतेचाही कळे पत्ता
ऐटीत पी तू, , ऐटीत जग तू
ऐटीत पी तू, ऐटीत जग तू
फिर नशेत तू, फिर गिर गिर


https://www.youtube.com/watch?v=Lr3KyhK5ysw

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.