गीतानुवाद-१९७: सौ साल पहले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-१९७: सौ साल पहले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०२१-०५-१४

गीतानुवाद-१९७: सौ साल पहले मुझे तुम से प्यार था

मूळ हिंदी गीतकारः हसरत, संगीतः शंकर-जयकिशन, गायकः रफी, लता
चित्रपटः असली-नकली, सालः १९६१, भूमिकाः देवानंद, आशा पारेख 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००९०३०३

 

धृ

सौ साल पहले मुझे तुम से प्यार था
आज भी है और कल भी रहेगा

र:

शतवर्षपूर्व जडले तुझ्यावरती प्रेम हे
आजही आहे आणि राहील उद्याही

 

सदियों से तुझ से मिलने जिया बेक़रार था
आज भी है और कल भी रहेगा

ल:

शतके अधीर मन हे तुला भेटण्याला
आजही आहे आणि राहील उद्याही

१

तुम रूठा न करो मेरी जाँ
मेरी जान निकल जाती है
तुम हँसती रहती हो
तो इक बिजली सी चमक जाती है
मुझे जीते जी ओ दिलबर, तेरा इंतज़ार था
आज भी है और और कल भी रहेगा

र:

रुसू नको माझे प्राणप्रिये
न माझा प्राण स्थिर राहे
तू हसत राहशील तर
तर एक वीज चमकून जाते
मला जितेजागतेपणी, तुझा ध्यास राहिला
आजही आहे आणि राहील उद्याही

२

इस दिल के तारों में
मधुर झंकार तुम्ही से है
और यह हसीन जलवा
यह मस्त बहार तुम्ही से है
दिल तो मेरा सनम, तेरा तलबगार था
आज भी है और और कल भी रेहेगा

ल:

अंतरीच्या तारांवर
मधुर झंकार तुझ्याचमुळे
आणि हे नितांत सुंदर
रूप, ही बहार तुझ्याचमुळे
मन तर माझे प्रिया, तुझ्यास्तव पिसे पिसे
आजही आहे आणि राहील उद्याही

३

इन प्यार की राहों में
कहो तो अब खुद को लुटा दूँ मैं
और चाँदी के क़दमों में
धड़कते दिल को बिछा दूँ मैं
तुझे मेरे जीवन पर सदा इख़्तियार था
आज भी है और और कल भी रेहेगा

र:

प्रेमाच्या मार्गांवर
म्हणशी तर मी स्वतःस करू सादर
आणि चंदेरी पदांवर तव
स्पंदते हृदय करू अर्पण
तुझा माझ्या जीवनावर सदा हक्क राहिला
आजही आहे आणि राहील उद्याही

 

https://www.youtube.com/watch?v=cTJ6Ug5QEZ0