मूळ हिंदी गीतः शकिल बदायुनी, संगीतः हेमंतकुमार, गायकः हेमंतकुमार
चित्रपटः बीस साल बाद, सालः १९६२, भूमिकाः वहिदा रेहमान, विश्वजीत
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२००९०५
॥ धृ ॥
|
बेकरार करके हमे यूँ न जाईये आपको हमारी कसम लौट आईये
|
अधीर करून नकोस अशी जाऊ तू तुला माझी शपथ सये परतून ये
|
॥
१
॥
|
देखिये वो काली काली बदलियाँ जुल्फ की घटा चुरा न ले कही चोरी चोरी आके शोख बिजलियाँ आपकी अदा चुरा न ले कही यूँ कदम अकेले न आगे बढाईये
|
ते पहा ते काळेकुट्ट ढग जणू चोरती केसांतुनी तव काजळी येउनी लपतछपत सौदामिनी नेती बघ तुझ्या कळा हरूनही एकटीच नको अशी जाऊ पुढे
|
॥
२
॥
|
देखिये गुलाब की वो डालियाँ बढके चूम ले न आपके कदम खोये खोये भँवरे भी है बाग में कोई आपको बना न ले सनम बहकी बहकी नजरों से खुदको बचाईये
|
त्या पहा गुलाबाच्या डिक्षा कशा झुकुनी पावले तुझी का चुंबती गुंगले भुंगेही फिरती उपवनी कुणी तुला करो सये न आपलीशी इकड तिकडच्या नजरांतुनी वाचव स्वतःस तू
|
॥
३
॥
|
जिंदगी के रास्ते अजीब है इनमें इस तरह चला न किजिये खैर है इसी मे आपकी हुजूर अपना कोई साथी ढुंढ लिजिये दिलसे दिलकी बात यूँ न मुस्कुराईये
|
जीवनाचे मार्ग हे अजब असे ह्यांवरून असे नको चालूस तू ह्यातची तुझे भले आहे सखे कोणी सोबती हुडक स्वतःस तू मनामनाचे गूज, असे नकोस स्मित करू
|
https://www.dailymotion.com/video/x2cs7p6
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.