२०१८-०५-२८

गीतानुवाद-१११: अभी न जाओ छोडकरमूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतः जयदेव, गायकः रफी, आशा
चित्रपटः हम दोनो, भूमिकाः देवानंद, नंदा
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे

धृ
रफी
अभी न जाओ छोडकर, के दिल अभी भरा नही
अभी अभी तो आई हो, अभी अभी तो
अभी अभी तो आई हो, बहार बन के छाई हो
हवा जरा महक तो ले, नजर जरा बहक तो ले
ये शाम ढल तो ले जरा, ये दिल सम्भल तो ले जरा
मैं थोडी देर जी तो लूँ, नशे के घुँट पी तो लूँ
अभी तो कुछ कहा नही, अभी तो कुछ सुना नहीं
रफी
नकोस जाऊ सोडूनी, न तृप्त मन अजूनही
आताच तर आलीस तू, आताच तर
आताच तर आलीस तू, खरी बहार झालीस तू
हवा सुगंध घेऊ दे, नजर जरा वळू तर दे
ही सांज अस्त पावू दे, हे सावरू दे मन जरा
मज काही क्षण जगू तर दे, धुंद फुंद होऊ दे
अजून मुळी न बोललो, तुझे न गूज परिसलो

आशा
सितारे झिलमिला उठे, सितारे झिलमिला उठे
बस अब न मुझको टोकना, न बढ के राह रोकना
अगर मैं रुक गई अभी, तो जा न पाऊँगी कभी
यही कहोगे तुम सदा, के दिल अभी नहीं भरा
जो खत्म हो किसी जगह, ये ऐसा सिलसिला नहीं
रफी
अभी नहीं अभी नहीं
आशा
नहीं नहीं नहीं नहीं
आशा
तारे चमकू लागले, दिवेही सर्व उजळले
नको मला रे हटकू तू, होऊन पुढे  न थांबवू
मी थांबले जरी आता, न शक्य जाणे मग पुन्हा
तू ऐकविशील हे सदा, न तृप्त मन, पुन्हा, पुन्हा
कधी तरी होईल पुरी, कहाणी ही अशी नव्हे
रफी
आता नको आता नको
आशा
नको नको नको नको

रफी
अधूरी आस, अधूरी आस छोडके
अधूरी प्यास छोडके
जो रोज यूँही जाओगी, तो किस तरह निभाओगी
कि जिंदगी की राह में, जवाँ दिलों की चाह में
कई मुकाम आएंगे, जो हम को आजमाएंगे
बुरा न मानो बात का, ये प्यार है गिला नहीं
आशा
हाँ, यही कहोगे तुम सदा के दिल अभी नहीं भरा
रफी
हाँ, दिल अभी भरा नहीं
आशा
नहीं नहीं नहीं नहीं
रफी
अपूरी ओढ, अपूरी ओढ सोडूनी,
अपूरी आस सोडूनी
तू रोज जाशी अशीच जर, कशी निभावशील तर
की जीवनाच्या मार्गी ह्या, युवा मनाच्या या आशा
पडाव येतीलही अनेक, जे पारखेन मी तसेच
नकोस मनास लावू तू, हे प्रेम आहे तक्रार नाही
आशा
हो, हेच तू म्हणशील आता, न तृप्त मन अजूनही
रफी
हो, न तृप्त मन अजूनही
आशा
नको नको, नको नको२०१८-०५-११

स्तोत्रानुवाद-०६: श्री वेङ्कटेश सुप्रभातम्मूळ संस्कृतः प्रतिवादी भयंकर अनंताचार्य इ.स.-१४३०
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१८०५१०

कौसल्या सुप्रजा राम पूर्वा सन्ध्या प्रवर्तते
उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यं दैवमान्हिकम्
कौसल्येच्या मुला रामा, पूर्वेला संधि जाहली
आवरी नरसिंहा तू, दैवे कर्तव्य जी दिली

उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविन्द उत्तिष्ठ गरुडध्वज
उत्तिष्ठ कमलाकान्ता त्रैलोक्यं मंगलं कुरु
ऊठ रे ऊठ गोविंदा, ऊठ रे गरुडध्वजा
ऊठ रे कमलाकांता, त्रिलोकी कर मंगल


मातस्समस्तजगतां मधुकैटभारेः
वक्षोविहारिणि मनोहरदिव्यमूर्ते
श्रीस्वामिनि श्रितजनप्रियदानशीले
श्रीवेङ्कटेशदयिते तव सुप्रभातम्
राहे मनात मधुकैटभहंतकाच्या
माता जगासच दिव्य सुमनोहरा जी
देई कृपाश्रय सुभक्त गणांस सार्‍या
लक्ष्मी तुझी शुभप्रभात हरीप्रिये हो

तव सुप्रभातमरविन्दलोचने
भवतु प्रसन्नमुखचन्द्रमण्डले
विधिशंकरेन्द्रवनिताभिरर्चिते
वृषशैलनाथदयिते दयानिधे
कमलाक्षि गे तव प्रभात होतसे
वदनी प्रसन्न उमलो सुतेजसे
विधिशंकरेंद्रवनिता सुपूजिते
वृषशैलनाथ सखये दयानिधे

अत्र्यादिसप्तऋषयस्समुपास्य सन्ध्यां आकाशसिन्धुकमलानि मनोहराणि
आदाय पादयुगमर्चयितुं प्रपन्नाः
शेषाद्रिशेखरविभो तव सुप्रभातम्
अत्र्यादि सात ऋषि साधुन संधि येत
आकाशसिंधुकमळांस अर्पावयाते
येती तुझ्याप्रत, पदांवर लीन होत
शेषाद्रिशेखरवरा तव सुप्रभात

कमलाकुचचूचुक कुङ्कुमतो
 नियतारुणितातुलनीलतनो
कमलायतलोचन लोकपते
विजयी भव वेङ्कटशैलपते
कमलाकुचकुंकुम पाहत जो
घनशामवर्ण गुलमोहरतो
कमलासमलोचन लोकपते
विजयी अस वेंकटशैलपते
 
सचतुर्मुखषण्मुखपंचमुख
प्रमुखाखिलदैवतमौलिमणे
शरणागतवत्सल सारनिधे
परिपालय मां वृषशैलपते
तु चतुर्मुख षण्मुख पंचमुखा
प्रमुखापरि तू सकला असशी
शरणा-करुणाकर, सारनिधे
परिपालय तू वृषशैलपते

विना वेङ्कटेशं न नाथो न नाथः
सदा वेङ्कटेशं स्मरामि स्मरामि
हरे वेङ्कटेश प्रसीद प्रसीद
प्रियं वेङ्कटेश प्रयच्छ प्रयच्छ
मला व्यंकटेशाविना स्वामि नाही
अशा व्यंकटेशा स्मरे नित्य मीही
हरी व्यंकटेशा मला हो प्रसन्न
प्रिया व्यंकटेशा मला दान देई

लक्ष्मीनिवास निरवद्यगुणैकसिन्धो
संसार सागर समुत्तरणैकसेतो
वेदान्तवेद्यनिजवैभव भक्तभोग्य
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम्
लक्ष्मीपते, गुणसिंधू सकलांस रे तू
भक्तास तारक भवाब्धिवरील सेतू
जे जाणणे जरुर ज्ञान सकलांस ते तू
श्री वेंकटाचलपते तव सुप्रभात


श्लोक क्र.
वृत्त
लक्षणगीत
पदातील अक्षरे१, २
अनुष्टुप्‌
चरण-१, ३      - - - - ल गा गा गा
चरण-२, ४       - - - - ल गा ल गा

३, ५, ९
वसंततिलका
ताराप-भास्कर-जनास-जनास-गागा
१४

मंजुभाषिणी
समरा-जनास-समरा-जनास-गा
१३

६, ७
तोटक
समरा-समरा-समरा-समरा
१२

भुजंगप्रयात
यमाचा-यमाचा-यमाचा-यमाचा
१२


तिरुमला पर्वतावरील सात प्रमुख शिखरांतील एक शिखर वेंकटाद्री किंवा वृषशैल हे आहे.
त्याचाच स्वामी ह्या अर्थाने;
विष्णूला वेंकटाचलपती, वेंकटशैलनाथ, वृषशैलपती इत्यादी विशेषणे वापरली गेलेली आहेत.

संदर्भः
१.
अधोभारणक्षम श्राव्य वेंकटेश सुप्रभातम्‌ 
https://www.marathidjs.org/filedownload/402/8141/001%20Venkatesh%20Stotra.html
२.

अधोभारणक्षम मराठी श्री वेंकटेश सुप्रभात
https://drive.google.com/file/d/1VsbD8uDRNq9zRWWAscwWBarTN1oP-Y3-/view?usp=sharing
३.
श्री वेंकटेश सुप्रभात बाबतच्या नऊ सुरस गोष्टी


२०१८-०५-०६

गीतानुवाद-१०९: जिंदगी मौत ना बन जाए


मूळ हिंदी गीतः जावेद अख्तर, संगीतः जतीन-ललित, गायकः सोनू निगम, रूपकुमार राठोड
चित्रपटः सरफरोश, सालः १९९९, भूमिकाः आमीरखान, सोनाली बेंद्रे

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६०६१९

धृ
जिंदगी मौत ना बन जाए, सम्हालो यारों
खो रहा चैनो अमन, मुष्किलों में है वतन
सरफरोशी की शमा दिल में जला लो यारो
जिंदगी मौत ना बन जाए, सम्हालो यारों
सांभाळा जीवना, मृत्यूपंथ ना धरू द्या
हरपते आहे शांती, देश संकटात आहे
प्राण देशास्तव, देण्याची भावना रुजवा
सांभाळा जीवना, मृत्यूपंथ ना धरू द्या

इक तरफ प्यार है, चाहत है, वफादारी है
इक तरफ देश में धोका है, गद्दारी है
बस्तियाँ सहमी हुई, सहमा चमन सारा है
गम में क्यों डुबा हुआ, आज सपना सारा है
आग पानी की जगह, अग्र जो बरसाएंगे
लहलहाते हुए खेत झुलस जाएंगे
खो रहा चैनो अमन, मुष्किलों में है वतन
सरफरोशी की शमा दिल में जला लो यारों
एकीकडे प्रेम आहे, आवडही, निष्ठाही आहे
दुसरीकडे देशातच धोका आणि फितुरीही आहे
वस्त्या भयभीत आणि देशही भयग्रस्त
आज स्वप्न आपले हे दुःखमग्न का आहे
शिंपती पाणी ना, ते वर्षती अग्नीच जेव्हा
शेते मौजेने विहरणारी होती ध्वस्त तेव्हा
हरपते आहे शांती, देश संकटात आहे
प्राण देशास्तव, देण्याची भावना रुजवा

चंद सिक्कों के लिये तुम ना करो काम बुरा
हर बुराई का सदा होता है अंजाम बुरा
जुर्मवालों की कहाँ उम्र बडी होती है
उनकी राहों में सदा मौत खडी होती है
जुर्म करने से सदा जुर्म ही हासिल होगा
जो न सच बात कहे वो कोई बुझदिल होगा
सरफरोशों ने, लहु दे के जिसे सिंचा है
ऐसे गुलशन को उजडने से बचा लो यारों
कामे वाईट नका पत्करू पैशाकरीता
वाईटच शेवटही, हरेक वाईटाचा असे
जुल्मी लोकांचीही का जीवने मोठी असती
त्यांच्या मार्गीही सदा यमदूत उभेची असती
जुलुम केल्याने सदा, जुलुमची पदरी पडतो
सत्य न बोले जो तो, नक्की घाबरट असतो
देशभक्तांनी, रक्त शिंपून, फुलविली जी ती
उपवने ना, कदापीही उजाडू द्या हो