गीतानुवाद-१२९: मेरे महबूब न जा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-१२९: मेरे महबूब न जा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१९-१०-२९

गीतानुवाद-१२९: मेरे महबूब न जा


मूळ हिंदी गीतः सबा अफगाणी, संगीतः जानी बाबू कव्वाल, गायीकाः सुमन कल्याणपूर
चित्रपटः नूर महल, सालः १९६५, भूमिकाः जगदीप, चित्रा

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१००१२४

॥धृ॥
मेरे महबूब न जा 
ना जा ना जा
मेरे महबूब न जा 
आज की रात न जा
होने वाली है सहर, थोड़ी देर और ठहर
मेरे महबूब न जा
माझ्या सजणा तू न जा
न जा न जा
माझ्या सजणा तू न जा
आजची रात न जा
पहाट होणार आहे, थोडा थांबून तू जा
माझ्या सजणा तू न जा

॥१॥
देख कितना हसीन मौसम है
हर तरफ़ इक अजीब आलम है
जलवे इस तरह आज निखरे हैं
जैसे तारे ज़मीं पे बिखरे हैं
पाहा सुंदर किती हवा आहे
सर्वदूर नूर हा नवा आहे
ऐट बहरली आज अशी आहे
दिप्ती तार्‍यांची भुईवर आहे

॥२॥
मैंने काटें हैं इन्तज़ार के दिन
तब कहीं आये हैं बहार के दिन
यूँ ना जा दिल कि शमा गुल कर के
अभी देखा नहीं है जी भर के
किती प्रतीक्षेत काढले दिस हे
तेव्हा आले बहारीचे दिस हे
असा तू जा न मनदिप विझवून
मनभर पाहिले न तुज मी अजून

॥३॥
जब से ज़ुल्फ़ों की छाँव पाई है
बेक़रारी को नींद आई है
इस तरह मत जा यूँही सोने दे
रात ढलने दे सुबह होने दे
लाभली सावली केसांची आहे
धीरतेस झोप आलेली आहे
असा न जा, पडून राहू दे
रात्र संपू दे, दिस उजाडू दे

॥४॥
इस तरह फेर कर नज़र मुझ से
दूर जाएगा तू अगर मुझसे
चाँदनी से भी आग बरसेगी
शम्मा भी रोशनी को तरसेगी
असा वळवून मान मजपासून
दूर जाशील जर तू माझ्यापासून
चांदण्यातूनही काहिली बरसेल
ज्योतही प्रकाशास्तव तरसेल

॥५॥
धड्कनों में यही तराने हैं
तेरे रुकने के सौ बहाने हैं
मेरे दिल की ज़रा सदा सुन ले
प्यासी नज़रों की इल्तजा सुन ले
स्पंदनांतून हेच गाणे आहे
तू न जाण्या शत बहाणे आहेत
माझ्या मनची साद तू ऐक
तृषित नजरेची विनंती तू ऐक