मूळ हिंदी गीतः शिवेन रिज़वी, अज़ीज़, संगीतकार : ओ.पी.नय्यर, गायकः महंमद रफी
चित्रपटः बहारें फिर भी आयेंगी, सालः १९६६, भूमिकाः धर्मेंद्र, तनुजा, माला सिन्हा
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१६०८०८
धृ
|
आप के हसीन रुख पे आज नया नूर है मेरा दिल मचल गया तो मेरा कसूर है आप की निगाह ने कहा तो कुछ जरूर है मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है
|
ग तुझ्या सौंदर्यावरती आज नवे तेज आहे माझे मन हरखले तर माझी काय चूक आहे काहीसे डोळ्यांनी तुझ्या सांगितले खास आहे माझे मन हरखले तर माझी काय चूक आहे
|
१
|
खुली लटों की छाव में खिला खिला ये रूप है घटा से जैसे छन रही सुबह सुबह की धुप है जिधर नज़र मुड़ी उधर सुरूर ही सुरूर है मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है
|
खुल्या बटांच्या सावलीत खुललेलं तुझं रूप आहे रात्रीशी जणू झटत इथे सकाळचे हे ऊन आहे जिथे नजर वळेल तिथे प्रसन्नता जरूर आहे माझे मन हरखले तर माझी काय चूक आहे
|
२
|
झुकी झुकी निगाह में भी है बला की शोखियाँ दबी दबी हसीं में भी तड़प रही है बिजलियाँ शबाब आपका नशे में खुद ही चूर चूर है मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है
|
झुकत जरी नजर, तिच्यात रम्य वीज आहे अस्फूट हासण्यातही विद्युल्लता खरीच आहे यौवन तुझे स्वतःच धुंद, चूर धुंदीतहि आहे माझे मन हरखले तर माझी काय चूक आहे
|
३
|
जहा जहा पड़े कदम वह फिजां बदल गयी के जैसे सर बसर बहार आप ही में ढल गयी किसी में ये कशिश कहा जो आप में हुज़ूर है मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है
|
पाऊल पडे तुझे तिथे बदलले गं ऋतू आहेत जणू बहार नखशिखांत, तुझ्या मुशीत सिद्ध आहे कुणात ओढ ही कशी, असेल जी तुझ्यात आहे माझे मन हरखले तर माझी काय चूक आहे
|
https://www.youtube.com/watch?v=GQblX2TmEZI
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.