गीतानुवाद-०५८: राही मनवा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-०५८: राही मनवा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१५-०८-१८

गीतानुवाद-०५८: राही मनवा दुख की चिंता

मूळ हिंदी गीतः मजरूह, संगीतः लक्ष्मीकांत-प्यारेलाल, गायक: रफी
चित्रपटः दोस्ती, भूमिकाःसुशीलकुमार, सुधीरकुमार, संजयखान

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००५१२०५

॥
धृ
॥
राही मनवा दुख की चिंता क्यूँ सताती है
दुख तो अपना साथी है
सुख है इक छाँव ढलती, आती है जाती है
दुख तो अपना साथी है
चित्ती पथिका दुःखभय तुला का सतावते रे दुःखची अपुला मित्र असे
सुख घटत्या सावलीसे, येते आणि जाते
दुःखची अपुला मित्र असे

॥
१
॥
दूर है मंझिल, दूर सही
प्यार हमारा क्या कम है
पग में काँटे लाख सही
पर ये सहारा क्या कम है
हमराह तेरे कोई अपना तो है
दूर असे घर दूर असो
प्रेम कमी ना हे अपुले
पायी काटे लाख रुतो
तरी हा सहारा खास पुरे
संगतीला तुझ्या कुणी आपला आहे

॥
२
॥
दुख हो कोई तब जलते है
पथ के दीप निगाहों में
इतनी बडी इस दुनिया की
लंबी अकेली राहों में
हमराह तेरे कोई अपना तो है
सलती दिवे नजरेमध्ये
वाटेतले, दुःखी असता
भव्य अशा विश्वामधल्या
लांबलचक सुन्या पथी ह्या
संगतीला तुझ्या कुणी आपला आहे