गीतानुवाद-०९३: आज की मुलाकात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-०९३: आज की मुलाकात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१७-०५-३०

गीतानुवाद-०९३: आज की मुलाकात बस इतनी

मूळ हिंदी गीतः राजेंद्रकृष्ण, संगीतः रवी, गायक: लता, महेंद्र कपूर
चित्रपट: भरोसा, साल: १९६३, भूमिका: गुरुदत्त, आशा पारेख

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१६०४०६


धृ
आज की मुलाकात बस इतनी
कर लेना बाते कल चाहे जितनी
अच्छी नहीं होती है ज़िद इतनी
देखो हमें तुमसे हैं प्रीत कितनी
लता

महेंद्र
आजचे हितगूज आता बस इतके
कर उद्या गूज पुरे हवे तितके
जिद्द एवढी न बरी कधी असती
पहा माझी तुझ्यावरी प्रीती किती

प्यार जो किया है जताते हो क्यों
बात ऐसी होठों पे लाते हो क्यों
और हम जो पूछे सताते हो क्यों
अभी अभी आए, अब जाते हो क्यों
लता

महेंद्र
प्रेम जे केलेस तेच सांगसी किती
बोलतात कुणी का रे अशा गोष्टी
मी हे विचारतो का त्रस्त करसी
आताच आलीस तर जातेस कशी

कभी कभी ऐसे भी आया करो
चाँद निकले तो घर जाया करो
आएँगे जाएँगे मर्जीसे हम
प्यार है तो नाज़ भी उठाया करो
महेंद्र

लता

कधी कधी उगीचचही येत रहा तू
चंद्र उगवल्यावरच घरी जा ग तू
येईन मी जाईन मी मर्जीने माझ्या
प्रेम केले आहे तर तोराही जप हा

ठहरो मैं दिल को संभालूँ जरा
पलकों में तुम को छुपा लूँ जरा
समझे ना अब तक मोहब्बत है क्या
आओ तुम्हें ये भी समझालू जरा
महेंद्र

लता

थांब घेतो मनाला मी सावरून जरा
पापण्यांत घेतो तुला साठवून जरा
कळले ना आजवर प्रीत काय असे
ये तुला सांगते मी तीच काय असे