गीतानुवाद-२९२: हर खुशी हो वहाँ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-२९२: हर खुशी हो वहाँ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०२४-०८-१८

गीतानुवाद-२९२: हर खुशी हो वहाँ

मूळ हिंदी गीतः गुलशन बावरा, संगीतः कल्याणजी आनंदजी, गायकः लता
चित्रपटः उपकार, सालः १९६८, भूमिकाः मनोजकुमार, आशा पारेख 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२४०८१८

 

धृ

हर खुशी हो वहाँ
तू जहाँ भी रहे
जिन्दगी हो वहाँ
तू जहाँ भी रहे

हर खुशी हो तिथे
तू जिथे राहशील
जिंदगी हो तिथे
तू जिथे राहशील

ये अँधेरे मुझे
इसलिए हैं पसंद
इनमें साया भी अपना
दिखाई ना दे
रोशनी हो वहाँ
तू जहाँ भी रहे

हे अंधेरे मला
याचसाठी पसंत
यात छाया स्वतःचीही
मुळी ना दिसे
असो प्रकाशही तिथे
तू जिथे राहशील

चाँद धुँधला सही
ग़म नहीं है मुझे
तेरी रातों पे रातों का
साया ना हो
चाँदनी हो वहाँ
तू जहाँ भी रहे

चांदणे हो मलूल
मज न त्याची क्षिती
तुझ्या रात्रींवर
रातीची छाया नको
चांदणे हो तिथे
तू जिथे राहशील