२०२०-०९-०८

गीतानुवाद-१६१: धड़कने लगे

मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतः एन. दत्ता, गायकः महेंद्र कपूर, आशा
चित्रपटः धूल का फूल, सालः १९५९, भूमिकाः राजेंद्रकुमार, माला सिन्हा

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२००९०९ 

धृ

धड़कने लगे दिल के तारों की दुनियाँ
जो तुम मुस्कुरा दो

आः
मः

स्पंदू लागते मनोरथांची ही दुनिया
जर तू स्मित करशी

 

संवर जाये हम बेकरारों की दुनियाँ
जो तुम मुस्कुरा दो

मः
आः

कशी सावरे बघ अधीराची दुनिया
जर तू स्मित करशी

जो तुम मुस्कुरा दो बहारें हसे
सितारों की उजली कतारें हसे

मः

जर तू स्मित करशी, बहार हासते ही
नभी तारकामालिका हासताती

 

जो तुम मुस्कुरा दो नज़ारें हसे
जवां धड़कनों के इशारे हसे

आः


जर तू स्मित करशी, दृश्यही हासताती
युवा स्पंदनांचे इशारेही हसती

 

हवा में ये खुश्बू की अंगड़ाईयाँ
ये आँखों पे ज़ुल्फों की परछाईयाँ

मः

हवेतही सुगंधाची वलये का उठती
डोळ्यांवर बटांच्या सावल्या काय येती

 

ये मस्ती के धारें उबलते हुये
ये सीनों में तूफान मचलते हुये

आः

 

ह्या मस्तीच्या लहरी अशा का उसळती
ही हृदयात संचारती वादळे

ये बोझल घटायें बरसती हुई
ये बेचैन रूहे तरसती हुई

मः

ही अवजड निशाही जणू वर्षते
ही बेचैन तळमळती का अंतरे

 

ये साँसों से शोले निकलते हुये
बदन आँच खाकर पिघलते हुये

आः

 

हे श्वासांतुन सुटते निखारे असे  
जणू आंच लागून तनू पाघळे


https://www.youtube.com/watch?v=1GsyUMp5WKY

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.