गीतानुवाद-२४३: ढूंढो ढूंढो रे साजना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-२४३: ढूंढो ढूंढो रे साजना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०२२-०३-२६

गीतानुवाद-२४३: ढूंढो ढूंढो रे साजना

मूळ हिंदी गीतः शकील बदायुनी, संगीतः नौशाद, गायिकाः लता
चित्रपटः गंगा-जमुना, सालः १९६१, भूमिकाः दिलीपकुमार, वैजयंतीमाला 

॥
धृ
॥

ढूंढो ढूंढो रे साजना ढूंढो रे साजना
मोरे कान का बाला
मोरा बाला चन्दा का जैसे हाला रे
जामें लाले लाले हा
जामें लाले लाले मोतियन की लटके माला

शोधा शोधा हो राजसा शोधा हो राजसा
माझ्या कानीचा वाळा
माझा वाळा चंद्राची चंद्रकळाच रे
ज्यात लाललाल हो
ज्यात लाललाल मोत्यांची झुलते माळा

॥
१
॥

मैं सोई थी, अपनी अटरवा
ठगवा ने डाका डाला
लुट गई निन्दिया, गिर गई बिंदिया
कानों से खुल गया बाला, बलम
मोरा बाला चन्दा ...

मी निजलेले गच्चीवरती
चोराने घातला घाला
झोप हरवली, बिंदीही ढळली
कानातील सुटला वाळा, सजण
माझा वाळा चंद्राची……

॥
२
॥

बाला मोरा बालेपन का
हो गई रे जा की चोरी
ओ छैला तोरा मनवा मैला
लागी नजरिया तोरी, बलम
मोरा बाला चन्दा ...

बालपणीचा वाळा माझा
झाली रे ज्याची चोरी
रे सजणा तव मळले अंतर
नजर रे लागली तुझी, सजण
माझा वाळा चंद्राची……

॥
३
॥

बाला मोरा सेजिया पे गिर गया
ढूंढे रे मोरे नैना
ना जानूँ पिया
तूने चुराय लिया
दइय्या रे कल की रैना, बलम
मोरा बाला चन्दा ...

माझा वाळा शय्येवर पडला
हुडकती नेत्र हे माझे
माहीत ना प्रिया
तूच पळवला
प्रिया तू कालच रात्री, सजण
माझा वाळा चंद्राची……