गीतानुवाद-००२: ऐ मेरी ज़ोहरा-ज़बीं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-००२: ऐ मेरी ज़ोहरा-ज़बीं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१२-०३-३०

गीतानुवाद-००२: ऐ मेरी ज़ोहरा-ज़बीं

मूळ हिंदी गीतकारः साहिर, संगीतः रवी, गायकः मन्ना डे
चित्रपटः वक्त, सालः १९६५, भूमिका बलराज सहानी, सुनील दत्त, राज कुमार

मराठी अनुवादः  नरेंद्र गोळे २००८०३१५

॥ धृ ॥

ऐ मेरी ज़ोहरा-ज़बीं, तुझे मालूम नहीं
तू अभी तक है हंसीं, और मैं जवाँ
तुझपे क़ुरबान मेरी जान मेरी जान

ए माझे संजीवनी, तुला माहीत नाही
अजूनही तू रुचिरा, आणि मी युवा
तुझ्यावर वाहिले कधीच मी जिवा

॥१॥

ये शोखियाँ ये बाँकापन
जो तुझ में है कहीं नहीं
दिलों को जीतने का फ़न
जो तुझ में है कहीं नहीं
मैं तेरी, मैं तेरी आँखों में
पा गया दो जहाँ

ते कटाक्ष, ती चपळाई अन्
जी तुझ्यात असे, नसे कुठे
ती कला मनास  मोहवी
जी तुझ्यात असे, नसे कुठे
तुझ्या, मी तुझ्या, डोळ्यात
पावलो सर्व जगा

 

॥२॥

तू मीठे बोल जान-ए-मन
जो मुस्कुराके बोल दे
तो धडकनों में आज भी
शराबी रंग घोल दे
ओ सनम, ओ सनम मैं तेरा
आशिक़-ए-जाबिदाँ

तू मधुर जे बोल बोलशी
हसून जराही सुंदरी
तर अजूनही स्पंदने
नशेत धुंद रंगती
ए परी, ए परी, मी तुझा
कायमच ग खुळा