२०१६-०६-०७

गीतानुवाद-०८२: जिंदगीभर नहीं भुलेगी वो बरसात की रात

मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतः रोशन, गायक: रफी, रफी/लता
चित्रपटः बरसात की रात, सालः १९६०, भूमिकाः मधुबाला, भारतभूषण, निम्मी

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६०८१८


धृ
जिंदगीभर नहीं भुलेगी वो बरसात की रात
एक अन्जान हसीना से मुलाकात की रात
जिंदगीभर न पावसाची, मी विसरेन ती रात
अनोळखीशा सुंदरीच्या प्रथम भेटीची रात
हाय वो रेशमी जुल्फों से बरसता पानी
फुल से गालों पे रुकने को तरसता पानी
दिल में तुफान उठाते हुए हालात की रात
जिंदगीभर नहीं भुलेगी वो बरसात की रात
हाय ते रेशमी केसांतून बरसते पाणी
फुलशा गाली विहरण्याला उत्सुक ते पाणी
अंतरी वादळे जागवत्या घटनांचीती रात
जिंदगीभर न पावसाची, मी विसरेन ती रात

डर के बिजली से अचानक वो लिपटना उसका
और फिर शर्म से बलखा के सिमटना उसका
कभी देखी न सुनी ऐसी तिलिस्मात की रात जिंदगीभर नहीं भुलेगी वो बरसात की रात
भिऊन विजेला, अचानक ते बिलगणे तीचे
आणि लाजेने चूर होऊन लोपणे तीचे
कधी न देखिली, न ऐकलीशी जादूभरी रात
जिंदगीभर न पावसाची, मी विसरेन ती रात

सुर्ख आँचल को दबाकर जो निचोडा उसने
दिल पे जलता हुआ एक तीर सा छोडा उसने
आग पानी में लगाते हुए जजबात की रात
जिंदगीभर नहीं भुलेगी वो बरसात की रात
लाल पदराला, आवरून पिळले जे तिने
हृदयी जळता जणू एक तीर सोडलेला तिने
आग पाण्यात लावणार्‍या भावनांची ती रात
जिंदगीभर न पावसाची, मी विसरेन ती रात

मेरे नग्मों में जो बसती है वो तस्वीर थी वो
नौजवानी के हसीं ख्वाब की ताबीर थी वो
आसमानों से उतर आई थी जो बात की रात जिंदगीभर नहीं भुलेगी वो बरसात की रात
वसते गीतात जी, माझ्या ती, तस्वीरशी ती तरुणपणीच्या धुंद स्वप्नांतली सुंदरी ही ती
आसमानातून उतरलेल्या हितगुजाची ती रात जिंदगीभर न पावसाची, मी विसरेन ती रातलता
जिंदगीभर नहीं भुलेगी वो बरसात की रात
एक अन्जान मुसाफिर से मुलाकात की रात
लता
जिंदगीभर न पावसाची, मी विसरेन ती रात
अनोळखीशा प्रवाशाच्या प्रथम भेटीची रात