मूळ हिंदी गीतकार: राजा मेहंदी अली खान, संगीत: मदनमोहन, गायिका: लता
चित्रपट: अनपढ, साल: १९६२, भूमिका: माला सिन्हा, धर्मेंद्र
मराठी
अनुवाद: नरेंद्र गोळे २००५०४२९
आपकी नजरों ने समझा
|
रे तुझ्या नजरेत ठरले
|
|
॥
धृ
॥
|
आपकी नजरों ने समझा,
प्यार के काविल मुझे
दिल की ए धडकन ठहर जा,
मिल गयी मंझिल मुझे
|
रे तुझ्या नजरेत ठरले,
प्रेम करण्या पात्र मी
थांब अंतर स्पंदना तू,
साध्य सापडले मला
|
॥
१
॥
|
जी हमे मंजूर है,
आपका ये फैसला
कह रही है हर नजर,
बंदा परवर शुक्रिया
हँसके अपनी जिंदगी मे
कर लिया शामिल मुझे
|
हो मला मंजूर असे,
हा असा निर्णय तुझा
वदत मम कटाक्ष हर,
प्रियकरा तुज धन्यवाद
हसत मजसी घेतले तव,
जीवनी सामील करून
|
॥
२
॥
|
आपकी मंझिल हूँ मै,
मेरी मंझिल आप है
क्यूँ मै तुफाँ से डरु,
मेरा साहिल आप है
कोई तुफानो से कह दे,
मिल गया साहिल मुझे
|
साध्य मी तुजसी असे अन्,
तूच माझे लक्ष्य रे
वादळा मी का भीऊ,
तू किनारा जर मला
कोणी सांगा त्यास आता,
मज किनारा लाभला
|
॥
३
॥ |
पड गई दिल पर मेरे,
आपकी परछाईयाँ
हर तरफ बजने लगी,
सैंकडो शहनाईयाँ
दो जहाँ की आज खुशियाँ,
हो गयी हासिल मुझे
|
उमटली मम अंतरावर,
छाप तुझी अस्फुटशी
चहुकडे शत सनईच्या,
गुंजल्या शब्दावली
दोन्ही विश्वातील खुशी ही,
लाभली मज आजला
|