२०२२-१२-३०

गीतानुवाद-२६४: एक प्यार का नग्मा है

मूळ हिंदी गीतः संतोष आनंद, संगीतः लक्ष्मीकांत प्यारेलाल, गायकः लता, मुकेश
चित्रपटः शोर, सालः १९७२, भूमिकाः मनोजकुमार, नंदा

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२२१०३०


धृ

एक प्यार का नगमा है
मौजों की रवानी है
ज़िंदगी और कुछ भी नहीं
तेरी मेरी कहानी है

एक गाणे हे प्रेमाचे
धारांचे प्रवाह आहेत
जीवन आणि काही नाही
तुझीमाझी कहाणी आहे

कुछ पाकर खोना है
कुछ खोकर पाना है
जीवन का मतलब तो
आना और जाना है
दो पल के जीवन से
इक उम्र चुरानी है

काही मिळवून गमवायचे
काही गमवून मिळवायचे
जगण्याचा अर्थच तर
येणे आणि जाणे आहे
दो घडीच्या आयुष्यातून
एक वयच आहे चोरायचे

तू धार है नदिया की
मैं तेरा किनारा हूँ
तू मेरा सहारा है
मैं तेरा सहारा हूँ
आँखों में समंदर है
आशाओं का पानी है

तू धार नदीची आहेस
मी तीर तुझा सजणे
आधार तू माझा रे
अन्‌ आधार तुला मी रे
डोळ्यात समुद्र जणू
आशांचे हे पाणी आहे

तूफ़ान तो आना है
आकर चले जाना है
बादल है ये कुछ पल का
छा कर ढल जाना है
परछाईयाँ रह जाती
रह जाती निशानी है

वादळ येणारच आहे
येऊनच ते जाणार आहे
ढग हा आहे क्षणभरचा
बरसून पडून जाणार आहे
राहतील तरी छाया
राहतील खुणा तरीही

जो दिल को तस्सल्ली दे
वो साज़ उठा लाओ
दम घुट ने से पहले हि
आवाज़ उठा लाओ
खुशियों का तरन्नुम है
अस्को की जबानी है

समाधान मना जो दे
तो सूर उचलून घ्यावा
श्वास जाईल तोवरती
आवाज उचलून घ्यावा
खुशीची ही गाणी आहेत
अश्रुंच्या कहाणीतील

२०२२-१२-१९

गीतानुवाद-२६३: लागा चुनरी में दाग

मूळ हिंदी गीतः साहिर, संगीतः रोशन, गायकः मन्ना डे
चित्रपटः दिल ही तो है, सालः १९६३, भूमिकाः राज कपूर नूतन 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०८०९

धृ

लागा चुनरी में दाग, छुपाऊँ कैसे
लागा चुनरी में दाग
चुनरी में दाग, छुपाऊँ कैसे, घर जाऊँ कैसे

पडला पदरी कलंक, लपवू कैसा
पडला पदरी कलंक
पडला कलंक, लपवू कैसी, घरी जाऊ कैसी

हो गई मैली मोरी चुनरिया
कोरे बदन सी कोरी चुनरिया
आ जाके बाबुल से, नज़रें मिलाऊँ कैसे
घर जाऊँ कैसे

पदर कलंकित झाला माझा
कोर्‍या तनुवत पदर तो कोरा
आ जाऊन वडिलांना देऊ नजर कैसी
घरी जाऊ कैसी

भूल गई सब बचन बिदा के
खो गई मैं ससुराल में आके
आ जाके बाबुल से, नज़रे मिलाऊँ कैसे
घर जाऊँ कैसे

वचने विसरले पाठवणीची
येऊन हरपले मी सासरासी
आ जाऊन वडिलांना देऊ नजर कैसी
घरी जाऊ कैसी

कोरी चुनरिया आत्मा मोरी
मैल है माया जाल
वो दुनिया मोरे बाबुल का घर
ये दुनिया ससुराल
हाँ जाके, बाबुल से, नज़रे मिलाऊँ कैसे
घर जाऊँ कैसे

कोरा पदर जणू आत्माच माझा
मळ जणू माया जाल
ती दुनिया माझ्या वडिलांचे घर
ही दुनिया सासुरवाड
आ जाऊन वडिलांना देऊ नजर कैसी
घरी जाऊ कैसी

आ आ~
धीम त न न न दिर दिर तानुम
ता न देरे न
धीम त न न न दिर दिर तान, धीम त देरे न
सप्त सुरन तीन ग्राम बंसी बाजी
दिर दिर तानी, ता नी नी द
नी द प म, प म म ग
म ध ग म म ग रे स
ध ध केटे ध ध ध केटे ध ध केट ध केट
धरत पाग पड़त नयी परण
झाँझर झनके झन नन झन नन
दिर दिर त तूम त द नी, त न न न त न न न
धीम त न न न न दिर दिर ताम

आ आ~
धीम त न न न दिर दिर तानुम
ता न देरे न
धीम त न न न दिर दिर तान, धीम त देरे न
सप्त सुरन तीन ग्राम बंसी बाजी
दिर दिर तानी, ता नी नी द
नी द प म, प म म ग
म ध ग म म ग रे स
ध ध केटे ध ध ध केटे ध ध केट ध केट
धरत पाग पड़त नयी परण
झाँझर झनके झन नन झन नन
दिर दिर त तूम त द नी, त न न न त न न न
धीम त न न न न दिर दिर ताम

गीतानुवाद-२६२: दुनियाँ करे सवाल तो हम क्या जबाब दे

मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतकार: रोशन, गायक: लता मंगेशकर
चित्रपट: बहू बेगम, सालः १९६७, भूमिकाः मीनाकुमारी 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२२१२१९

धृ

दुनियाँ करे सवाल, तो हम क्या जबाब दे
तुम कौन हो ख़याल, तो हम क्या जबाब दे

विचारेल जग मला, तर मी काय उत्तरू
तू कोण ह्या विचारास, मी काय उत्तरू

पूछे कोई के दिल को कहाँ छोड़ आये हो
किस किस से अपना रिश्ता-ए-जान जोड़ आये हैं
मुश्किल हो अर्ज-ए-हाल तो, हम क्या जबाब दे

विचारेल कोणी चित्त कुठे सोडलेस तू
आपला कुणाकुणाशी जीव जडवलास तू
सांगणे असेल कठीण, तर मी काय उत्तरू

पूछे कोई दर्द-ए-वफ़ा कौन दे गया
रातों को जागने की सजा कौन दे गया
कहने पे हो मलाल, तो हम क्या जबाब दे

विचारेल प्रीतीदुःख कुणी तुज दिले असे
रात्रीस जागण्याची सजा कुणी दिली असे
बोलून होय दुःख, तर मी काय उत्तरू

२०२२-१२-१८

गीतानुवाद-२६१: मैं ने एक ख़्वाब सा देखा है

मूळ हिंदी गीतकार: साहिर, संगीत: रवी, गायक:
चित्रपट: वक्त, साल: १९६५, भूमिका: शशी कपूर, शर्मिला टागोर 

मराठी अनुवाद:  नरेंद्र गोळे २०१३०७०५


धृ

मैं ने एक ख़्वाब सा देखा है
कहो
सुन के शरमा तो नहीं जाओगी?
नहीं, तुम से नहीं

मी एक स्वप्न पाहिले आहे
सांग ना
ऐकून लाजणार तर नाहीस
नाही, तुझ्यापाशी नाही



मैं ने देखा है कि फूलों से लडी शाखों में
तुम लचकती हुई यूँ मेरी क़रीब आई हो
जैसे मुद्दत से यूँ ही साथ रहा हो अपना
जैसे अब की नहीं सदियों की शनासाई हो

पाहिले मी की फुलांनी बहरल्या शाखांत
मुरडत माझ्यापाशी आलेली आहेस तू
जणू काही दीर्घकाळ आपण सोबतच आहोत
आजचा नाही कधीचाच सहवास आपला असे



मैं ने भी ख़्वाब सा देखा है
कहो, तुम भी कहो
खुद से इतरा तो नहीं जाओगे?
नहीं खुद से नहीं

मीही एक स्वप्न पाहिले आहे
सांग, तूही सांग स्वप्न तुझे
स्वतःवरच खुश तर होणार नाहीस ना?
नाही स्वतःवर नाही



मैं ने देखा कि गाते हुए झरनों के क़रीब
अपनी बेताबी--जज़बात कही है तुम ने
काँपते होंठों से रुकती हुई आवाज़ के साथ
जो मेरे दिल में थी वो बात कही है तुम ने

पाहिले मी की गाणार्‍या झर्‍यांच्या पाशी
तुझ्या अनिवार भावनांना व्यक्तवले आहेस
कापत्या ओठांत थांबल्या आवाजासोबत
माझ्या मनातलीच गोष्ट, बोलली ग तू आहेस



आँच देने लगा क़दमों के तले बर्फ़ का फ़र्श
आज जाना कि मुहब्बत में है गर्मी कितनी
संगमरमर की तरह सख़्त बदन में तेरे
आ गयी है मेरे छू लेने से नर्मी कितनी

ऊब देऊ करे पायांतळी बर्फाची फरस
आज कळले की प्रीत ऊबही देते किती ते
संगमरवरापरी कठीण शरीर ते तवही
माझ्या स्पर्शाने किती झाले मुलायम आहे



हम चले जाते हों और दूर तलक कोई नहीं
सिर्फ़ पत्तों के चटकने की सदा आती है
दिल में कुछ ऐसे ख़यालात ने करवट ली है
मुझ को तुम से नहीं अपने से हया आती है

आम्ही चाललो दूरवर पण कुणीही नाही
फक्त पानांच्या टपकण्याची चाहूलच येते
मनात काही असल्या विचारांनी उचल केली
मला तुझी नाही, स्वतःचीच शरम येत आहे



मैं देखा है कि कोहरे से भरी वादी में
मैं ये कहता हूँ चलो आज कहीं खो जायें
मैं ये कहती हूँ कि खोने की ज़रूरत क्या है
ओढ कर धुंध की चादर को यहीं सो जायें

पाहिले मी की धुके दाटल्या खोर्‍यात
म्हणतो मी की चला जाऊ कुठेशी हरवून
म्हणते मी की हरवण्याची जरूरच काय आहे
पांघरून धुक्याची चादर इथेच झोपू या

गीतानुवाद-२६०: वक़्त से दिन और रात

मूळ हिंदी गीतकारः साहिर, संगीतः रवी, गायिका: मन्ना डे
चित्रपटः वक्त, सालः १९६५, भूमिका: साधना, राज कुमार 

मराठी अनुवादः  नरेंद्र गोळे २०१३०७०५

प्र
स्ता

कल जहाँ बटती थी खुशिया
आज है मातम वहाँ
वक्त लाया था बहारे
वक्त लाया है खिजा

काल जिथं आनंद वितरे
आज तिथं शोकच महा
काळानेच आणली बहार
काळानेच आणला अकाल


धृ

वक्त की गर्दिश से है
चाँद तारों का निजाम
वक्त की ठोकर में है
क्या हुकुमत क्या समाज

काळाच्या संकटात
आहे चंद्रसूर्यांचा प्रकाश
काळाच्या पायाशी आहे
राजसत्ता वा समाज



वक़्त से दिन और रात
वक़्त से कल और आज
वक़्त की हर शय ग़ुलाम
वक़्त का हर शय पे राज

काळामुळेच हो दिनरात
काळामुळेच काल अन्‌ आज
काळाचा हर क्षण गुलाम
क्षणोक्षणी काळाचे राज



वक़्त की पाबन्द हैं
आते जाते रौनके
वक़्त है फूलों की सेज
वक़्त है काँटों का ताज

काळाला बांधील आहे
येती जाती आतिषे
काळ पुष्पशय्या कधी
काळ मुकुट काटेरीही



आदमी को चाहिये
वक़्त से डर कर रहे
कौन जाने किस घड़ी
वक़्त का बदले मिजाज़

माणसाने पाहिजे
घाबरून काळास राहणे
कोण जाणे कुठल्या क्षणी
मर्जी काळाची फिरेल


गीतानुवाद-२५९: सपने सुहाने लड़कपन के

मूळ हिंदी गीतकार: शकील, संगीत: हेमंतकुमार, गायीका: लता
चित्रपट: बीस साल बाद, सालह १९६२ भूमिका: विश्वजीत, वहिदा रहेमान 

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००७०११७

धृ

सपने सुहाने लड़कपन के
मेरे नैनों में डोले बहार बन के

सुंदरशी स्वप्ने लहानपणची
माझ्या डोळ्यात झुलती बहार भरती

जब छाए घटा मतवाली
मेरे दिल पे चलाए आरी
घबराये अकेले मनवा
मैं लेके जवानी हारी
कैसे कटें दिन उलझन के
कोई लादे ज़माने वो बचपन के

जेव्हा रात्र पडे मदमस्त
चालवी मनावर अस्त्र
घाबरे एकटे मन हे
मी यौवन घेऊन हरते
सरतील कसे दिस हे भ्रांतीचे
कुणी आणा ना ते दिस आवडते  

जब दूर पपीहा बोले
दिल खाये मेरा हिचकोले
मैं लाज में मर-मर जाऊँ
जब फूल पे भंवरा डोले
छेड़े पवनिया तराने जब मन के
मुझे भाये न ये रंग जीवन के

जेव्हा दूर कोकिळा बोले
मन हिंदोळ्यावर डोले
मी लाजेने चूरच होते
जव भ्रमर फुलावर खेळे
जव वारा स्फुरे गीत अंतरी ’ते’
मला रुचती ना हे रंग जगतीचे

२०२२-१२-१७

गीतानुवाद-२५८: मेरे महबूब तुझे

मूळ हिंदी गीतः शकील बदायुनी, संगीतः नौशाद, गायकः मोहम्मद रफी
चित्रपटः गझल, सालः १९६३, भूमिकाः राजेंद्रकुमार, साधना

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२२१२१७

 

धृ

मेरे महबूब तुझे मेरी मोहब्बत की कसम
फिर मुझे नर्गिसी आँखों का सहारा दे दे
मेरा खोया हुआ रंगीन नज़ारा दे दे
मेरे महबूब तुझे मेरी मोहब्बत की कसम

प्रिये माझे तुला माझ्या ग प्रीतीचि शपथ
मज तुझ्या नजरेची विश्वासफुले ग दे तू
मज हरवलेले माझे इंद्रधनु ग दे तू
प्रिये माझे तुला माझ्या ग प्रीतीचि शपथ

ऐ मेरे ख्वाब की ताबीर मेरी जान ए जिगर
जिन्दगी मेरी तुझे याद किये जाती है
रातदिन मुझको सताता है तसव्वुर तेरा
दिल की धडकन तुझे आवाज दिये जाती है
आ मुझे अपनी सदाओं का सहारा दे दे

ए माझे स्वप्नफळ, ग प्राणप्रिय सखे
माझे जीवन तुझ्या आठवणी काढत असते
रातदिन मला आठव ग सतावतो बघ तुझा
हृदयस्पंदनही पुकारे बघ प्रत्यही का तुला
देई चाहूल तरी, इतका तू दिलासा दे ग

भूल सकती नहीं आँखे वो सुहाना मंज़र
जब तेरा हुस्न मेरे इश्क़ से टकराया था
और फिर राह में बिखरे थे हज़ारो नग्मे
मै वो नगमे तेरी आवाज़ को दे आया था
साज़-ए-दिल को उन्हीं गीतों का सहारा दे दे

मी न विसरू शकत माझाच आवडता तो क्षण
तुझे सौंदर्य माझ्या प्रीतीस धडकले होते
आणि मग वाटेतच स्फुरलेली हजारो गीते
मी ती गीते तुझ्या आवाजाला देऊन आलो
हृदयस्पंदांना त्या गीतांनी भरवसा दे ग

याद है मुझ को मेरी उम्र की पहली वो घडी
तेरी आँखों से कोई जाम पिया था मैंने
मेरी रग रग में कोई बारक़ सी लहराई थी
जब तेरे मरमरी हाथो को छुआ था मैंने
आ मुझे फिर उन्हीं हाथों का सहारा दे दे

याद आहेत मला आयुष्यातील पहिले ते क्षण
तुझ्या डोळ्यांनी मी अमृत प्राशिले होते
रोमरोमात माझ्या वीज लहरली होती
जव तुझ्या मखमली हातांना स्पर्शलो होतो
त्या तुझ्या हातांचा आधार मला तू दे ग

मैंने एक बार तेरी एक झलक देखी है
मेरी हसरत है के मै फिर तेरा दीदार करूँ
तेरे साये को समझकर मई हसीं ताजमहल
चांदनी रात में नज़रो से तुझे प्यार करूँ
अपनी मेहकी हुयी ज़ुल्फो का सहारा दे दे

मी एक वार तुला डोळ्यांनी पाहिले आहे
मला वाटे की तुझे रूप पाहावे पुन्हा
तुझ्या छायेला समजून सुरेख राजमहाल
चांदण्या राती मी नजरेने तुला प्रेम करू
तव सुगंधीत केसांचा दिलासा दे तू

ढूंढता हूँ तुझे हर राह में हर महफ़िल में
थक गए है मेरी मजबूर तमन्ना के कदम
आजका दिन मेरी उम्मीद का है आखरी दिन
कल न जाने मैं कहा और कहा तू हो सनम
दो घडी अपनी निगाहों का सहारा दे दे

तुला शोधे मी हर मार्गी, दर समारोही
थकली आहेत माझ्या दीन इच्छेची पदही
आजचा दिस माझ्या आशेचा शेवटला आहे
उद्या माहीत नाही असशी कुठे तू, कुठं मी
दो घडी नेत्रांचा विश्वास मला तू दे ग

सामने आके ज़रा पर्दा उठा दे रुख से
एक यही मेरा इलाज-इ-ग़म-इ-तन्हाई है
तेरी फुरकत ने परेशां किया है मुझ को
अब तो मिलजा के मेरी जान पे बन आयी है
दिल को भूली हुई यादों का सहारा दे दे

समोर येऊन जरा चेहरा तर दिसू दे ग
माझ्या विरहातल्या दुःखाचा तो इलाज आहे
तुझ्या विरहाने मला त्रस्त केलेले आहे
आता तरी भेट जीवावर बेतले आहे
विसरलेल्याशा क्षणांचा ग भरवसा दे तू

२०२२-१२-१६

गीतानुवाद-२५७: ज़रा नज़रों से कह दो जी

मूळ हिंदी गीतः शकील बदायुनी, संगीतः हेमंतकुमार, गायकः हेमंतकुमार
चित्रपटः बीस साल बाद, सालः १९६२, भूमिकाः वहिदा रहमान, विश्वजीत 

नरेंद्र गोळे २०२२१२१५

 

धृ

ज़रा नज़रों से कह दो जी
निशाना चूक न जाए
ज़रा नज़रों से कह दो जी
मज़ा जब है तुम्हारी
हर अदा क़ातिल ही कहलाए
ज़रा नज़रों से कह दो जी

सांग नजरेस जरा तू की
निशाणा चूक ना होवो
सांग नजरेस जरा तू की
मजा तेव्हाच, प्रिये होते
तुझी हर लकब जीवघेणी  
सांग नजरेस जरा तू की

क़ातिल तुम्हे पुकारूँ के
जान-ए-वफ़ा कहूँ
हैरत में पड़ गया हूँ
के मैं तुम को क्या कहूँ
ज़माना है तुम्हारा
ज़माना है तुम्हारा चाहे
जिसकी ज़िंदगी ले लो
अगर मेरा कहा मानो
तो ऐसे खेल न खेलो
तुम्हारी इस शरारत से
न जाने किस की मौत आए

जीवघेणी म्हणू तुज की
प्राणप्रिये म्हणू तुज मी
बुचकळ्यात पडलो आहे की
मी तुला काय म्हणू
काळ तुझा पक्षधर आहे
काळ तुझा पक्षधर आहे
हवे त्याचे प्राण घे तू
माझे म्हणणे ऐकशील तर
असे नको खेळ खेळू
तुझ्या खोडीने असल्या
कुणाचे प्राण ना जावो

हाय कितनी मासूम
लग रही हो तुम
तुमको ज़ालिम कहे
वो झूठा है
ये भोलापन तुम्हारा
ये भोलापन तुम्हारा
ये शरारत और ये शोखी
ज़रूरत क्या तुम्हें तलवार की
तीरों की खंजर की
नज़र भर के जिसे तुम देख लो
वो खुद ही मर जाए

हाय किती निरागस
भासते आहेस तू
जीवघेणी म्हणणारा
नक्कीच खोटा असेल
हे भोळेपण तुझे
हे भोळेपण तुझे
खोडकरपण, चपळताही
जरूरच काय तुला
तीर, तलवार, खंजिरांची
डोळेभर पाहसी ज्याला तो
आपसुखच मरून जाई

हम पे क्यों इस क़दर बिगड़ती हो
छेड़ने वाले तुमको और भी हैं
बहारों पर करो गुस्सा
उलझती हैं जो आँखों से
हवाओं पर करो गुस्सा
जो टकराती हैं ज़ुल्फ़ों से
कहीं ऐसा न हो कोई
तुम्हारा दिल भी ले जाए

मजवर का अशी होशी नाराज
तुला डिवचणारे इतरही आहेत
बहारीवर राग धर तू
जी डोळ्यांत भरून राहे
हवेवरती राग धर तू
जी सदा उडवत बटा राहे
चुकून होवो न असेही की
कुणी तव हृदय हरून जावो

२०२२-१२-०१

गीतानुवाद-२५६: जाने क्यूँ लोग प्यार करते हैं

मूळ हिंदी गीतः जावेद अख्तर, संगीतः शंकर अहसान लॉय, गायकः उदित नारायण, अलका याग्निक
चित्रपटः दिल चाहता है, सालः २००१, भूमिकाः आमीरखान, अक्षय खन्ना, सैफ अली, प्रीती झिंटा 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०१२३

धृ

जाने क्यूँ लोग प्यार करते हैं
जाने क्यूँ वो किसी पे मरते हैं
जाने क्यूँ ऽ ऽ जाने क्यूँ? जाने क्यूँ?
जाने क्यूँ? जाने क्यूँ?

कळेना लोक प्रेम का करती?
का म्हणून ते कुणावरती मरती?
कळेना का? ऽ ऽ कळेना का? कळेना का?
कळेना का? कळेना का?

प्यार में सोचिए तो बस गम है
प्यार में जो सितम भी हो कम है
प्यार में सर झुकाना पड़ता है
दर्द में मुस्कुराना पड़ता है
ज़हर क्यूँ ज़िंदगी में भरते हैं?
जाने क्यूँ वो किसी पे मरते हैं?

प्रेमात पाहता दु:खच केवळ
प्रेमी अपराध मुळी कमी नाहीत
प्रेमामध्ये लागते वाकावे
दुःख लपवुन स्मिताचे देखावे
विष जगण्यात का ते कालवती
का म्हणून ते कुणावरती मरती?

प्यार बिन जीनें में रखा क्या है?
प्यार जिस को नहीं वो तन्हा है
प्यार सौ रंग ले के आता है
प्यार ही ज़िंदगी सजाता है
लोग छुप छुप के प्यार करते हैं
जानें क्यूँ साफ़ कहते डरते हैं?

प्रेमाविण जीवनात काय आहे?
एकटा तो, न जो प्रेमात आहे
प्रेम शत रंग लेवूनी येते
प्रेम आयुष्य छान सजविते
लोक चोरून प्रेम करताती
कबूल करण्यास का म्हणून भीती?

प्यार बेकार की मुसीबत है
प्यार हर तरह खूबसूरत है
हो प्यार से हम दूर ही अच्छे
अरे प्यार के सब रूप हैं सच्चे
हो प्यार के घाट जो उतरते हैं
डूबते हैं न वो उभरते हैं
प्यार तो खैर सभी करते हैं
जाने क्यूँ आप ही मुकरते हैं?

प्रेम कटकट निष्कारण आहे
प्रेम सुंदर, हर तर्‍हेने आहे
प्रेमापासून दूर रहावे ते बरे
प्रेमाचे हर रूप भासते खरे
प्रेमसरितेत जे उतरती हो
नेमके बुडती, ना तरंगती हो
प्रेम सगळे मनापासून करता
तुम्हीही का कळेना ना करता?