२०२६-१०-०४

गीतानुवाद-३४०: पिया तोसे नैना लागे रे

मूळ हिंदी गीत: शैलेंद्र, संगीतकार: सचिन देवबर्मन, गायिका: लता मंगेशकर
चित्रपट: गाईड (हिंदी), सालः १९६५, भूमिका: वहिदा रेहमान, देव आनंद 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२६१००२


धृ

पिया तोसे नैना लागे रे नैना लागे रे
जाने क्या हो अब आगे रे नैना लागे रे

डोळे तुझ्यावरच जडले रे डोळे जडले रे
आता होईल काय पुढे रे डोळे जडले रे

१

जगने उतारे धरती पे तारे
पर मन मेरा मुरझाये
उन बिन आई ऐसी दीवाली
मिलने को जिया अकुलाये
आ सजन पायल पुकारे
झनक झन झन झनक झन झन

जगाने उतरवले धरतीवर तारे
मन माझे तरी का हिरमुसे
त्याचेविना आली अशी दिपवाळी
भेटीस हा जीव तळमळे
ये रे सजणा पैंजण पुकारे
झनक झन झन झनक झन झन

२

भोर की बेला सुहानी नदिया के तीरे
भर के गागर जिस घड़ी मैं चलूँ धीरे धीरे
तुझ पे नज़र जब जाए (हाय रे हाय)
जाने क्यों बज उठे कंगना
छनक छन छन छनक छन छन

वेळ पहाटेची लाडकी नदीच्या तीरी रे
भरून घागर ज्या क्षणी मी चालू हळूहळू
तुजवरी जव नजर जाये रे (हाय रे हाय)
न जाणे का वाजती कंकण
छनक छन छन छनक छन छन

३

आई होली आई हो सब रंग लाई
बिन तेरे होली भी न भाए हो
भर पिचकारी हो सखियों ने मारी
भीगी मोरी सारी हाये हाये
तनबदन मेरा कांपे थर थर
धिनक धिन धिन धिनक धिन धिन

आली होळी आली हो सर्व रंग वाली
तुजविण परी होळी न रुचते हो
भरून पिचकारी सख्या मारती वरती
भिजली माझी साडी हाये हाये
तनमन मम कापते थरथर
धिनक धिन धिन धिनक धिन धिन

४

रात को जब चाँद चमके
जल उठे तन मेरा
मैं कहूँ मत करो चंदा
इस गली का फेरा
आना मोरा सैयाँ जब आए
चमकना उस रात को जब
मिलेंगे तनमन मिलेंगे तनमन

रात्रीचा जव चंद्र चमके
जळते अंगच माझे
मी म्हणते येऊ नको तू
चंद्रा गलीला या रे
येऊ दे साजण यायचे तेव्हा
चमक त्या रात्रीस जेव्हा
मिळती तनंमनं मिळती तनंमनं