२०२०-०९-१३

गीतानुवाद-१६६: आवाज़ देके हमें तुम बुलाओ

मूळ हिंदी गीतकारः हसरत, संगीतः शंकर जयकिशन, गायकः रफ़ी, लता
चित्रपटः प्रोफेसर, सालः १९६२, भूमिकाः शम्मी कपूर, कल्पना 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००७१०३०

धृ

आवाज़ देके हमें तुम बुलाओ
मोहब्बत में इतना ना हमको सताओ

लता

बोलाव आवाज देऊन मला तू
प्रेमात इतके नको ना सतावू

अभी तो मेरी ज़िंदगी है परेशां
कहीं मर के हो खाक भी परेशां
दिये की तरह से हमको जलाओ
मोहब्बत में इतना ना हमको सताओ

लता

संत्रस्त आहे हे आयुष्य माझे
संत्रस्त राखही होवो जळाऊ
दिव्यागत नको जाळूस मला तू
प्रेमात इतके नको ना सतावू

मैं सांसों के हर तार में छुप रहा हूँ
मैं धड़कन के हर राग में बस रहा हूँ
ज़रा दिल की जानिब निगाहें झुकाओ
मोहब्बत में इतना ना हमको सताओ

रफ़ी

मी श्वाससरांतून मिसळून राहू
मी हर स्पंदनातून संगीत गाऊ
प्रेमार्द्र नजरेतुनी मज पाहा तू
प्रेमात इतके नको ना सतावू

ना होंगे अगर हम तो रोते रहोगे
सदा दिल का दामन भिगोते रहोगे
जो तुम पर मिटा हो उसे ना मिटाओ
मोहब्बत में इतना ना हमको सताओ

लता

राहेन जर तर राहाशील रडत तू
सदा वस्त्र मनचे भिजवशील वरी तू
मिटे तुजवरी त्या, मिटवूस रे तू
प्रेमात इतके नको ना सतावू

 

https://www.youtube.com/watch?v=nOTxejJPvHY

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.