गीतानुवाद-०९१: मन रे तू काहे न लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-०९१: मन रे तू काहे न लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१७-०१-२७

गीतानुवाद-०९१: मन रे तू काहे न धीर धरे

मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतः रोशन, गायकः मोहंमद रफी
चित्रपटः चित्रलेखा, सालः १९४१, भूमिकाः प्रदीपकुमार, मीनाकुमारी

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१७०१२४


॥
धृ
॥
मन रे तू काहे न धीर धरे
वो निर्मोही मोह न जाने
जिनका मोह करे
धरसी मना का न धीर बरे
ते निर्मोही मोह न जाणे
ज्यांचा मोह पडे

॥
१
॥
इस जीवन की चढती ढलती
धूप को किसने बांधा
रंग पे किसने पहरे डाले
रूप को किसने बांधा
काहे ये जतन करे
ह्या जगण्याच्या चढत्या ढळत्या
बांधले कुणी उन्हाला
पहारे कुणी रंगावर केले
बांधले कुणी रूपाला
का जपशी तू हे

॥
२
॥
उतना ही उपकार समझ कोई
जितना साथ निभाये
जन्म-मरन का मेल हैं सपना
ये सपना बिसरा दे
कोई न संग मरे
तितकाची उपकार समज कुणी
जितकी सोबत दे
जन्मभराची सोबत स्वप्नच
विसर तू स्वप्नच हे
कोणी न संग मरे