मूळ हिंदी गीतकार:
साहिर लुधियानवी, संगीतकार: खय्याम, गायिकाः सुमन कल्याणपूर,
चित्रपटः शगुन, सालः १९६४, भूमिकाः वहिदा रहेमान, कमलजीत
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००५०७०६
|
॥
धृ
॥
|
बुझा दिये हैं खुद अपने हाथों
मुहब्बतों के दिये जलाके
मेरी वफ़ा ने उजाड दी हैं
उम्मीद की बस्तीयाँ बसाकर
|
मी विझविले हे पहा उजाळून
प्रीतीचे सारे दिवे असंख्य
प्रेमाने माझ्या उजाड केली
आशेची वसवून ही वसाहत
|
|
॥
१
॥
|
तुझे भुला देंगे अपने दिल से
यह फ़ैसला तो किया है लेकिन
न दिल को मालूम है ना हम को
जियेंगे कैसे तुझे भुलाके
|
तुला मनातून पुसून टाकीन
हा घेतला निर्णय मी परंतु
ना माहिती मनाला, मलाही
तुजसी विसरून जगू कशी मी
|
|
॥
२
॥
|
कहीं मिलेंगे जो रासते में
तो मुँह छुपाकर पलट पडेंगे
कहीं सुनेंगे जो नाम तेरा
तो चुप रहेंगे नज़र झुकाके
|
कुठे तू दिसशी जरी पथावर
मी तोंड वळवून परत फिरेन
कुठे तुझे नाव ही परिसता
मी मान झुकवून मूक राहीन
|
|
॥
३
॥
|
न सोचने पर भी सोचती हूँ
के ज़िंदगानी में क्या रहेगा
तेरी तमन्ना दफ़्न करके तेरे
खयालोंसे दूर जाके
|
विचार, न विचाराचा करता
ह्या जीवनी मग उरेल काय
तुझी आसक्ती पुरून आणि
तुझ्या विचारांना दूर सारून
|