२०२०-०९-१४

गीतानुवाद-१६७: छुपा लो यूँ दिल में प्यार मेरा

मूळ हिंदी गीतः मजरूह, संगीतः रोशन, गायकः लता, हेमंत
चित्रपटः ममता, साल १९६६, भूमिकाः अशोककुमार, सुचित्रा सेन 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे  २००८०५१०

धृ

हेः
छुपा लो यूँ दिल में प्यार मेरा
के जैसे मंदिर में लौ दिये की

हेः
हृदयी धरी तू ही माझी प्रीती
ही मंदिरातील दिव्याची ज्योती

लः
तुम अपने चरणों में रख लो मुझको
तुम्हारे चरणों का फूल हूँ मैं
मैं सर झुकाए खड़ी हूँ प्रियतम
के जैसे मंदिर में लौ दिये की

लः
तू पायथ्याशी मला असू दे
तुझ्या पदी वाहिलेले फुल मी
मी मान लववून उभीच प्रियतम
मी मंदिरातील दिव्याची ज्योती

हेः
ये सच है जीना था पाप तुम बिन
ये पाप मैने किया है अब तक
मगर है मन में छवि तुम्हारी
के जैसे मंदिर में लौ दिये की

हेः
खरंय हे जीवन, आहे पाप तुजविण
तरी हे पापही केलंय मी इथवर
परंतु हृदयी तुझीच मूर्ति
की मंदिरातील दिव्याची ज्योती

लः
फिर आग बिरहा की मत लगाना
के जलके मैं राख हो चुकी हूँ
हेः
ये राख माथे पे मैने रख ली
के जैसे मंदिर में लौ दिये की

लः
पुन्हा चेतवू व्यथा ही विरही
की मी जळून राख आहे झालेली
हेः
ही राख भाळी मी लाविलेली
की मंदिरातील दिव्याची ज्योती


https://www.youtube.com/watch?v=GXgKgZt9Jik

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.