मूळ हिंदी गीतः शकील, संगीतः रवी, गायकः रफी
चित्रपटः दो बदन, सालः १९६६, भूमिकाः मनोज कुमार, आशा पारेख
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०८१५
॥
धृ
॥
|
रहा गर्दिशों में हरदम
मेरे इश्क़ का सितारा
कभी डगमगायी कश्ती,
कभी खो गया किनारा
|
सदा विघ्नवश राहिला
हा माझा प्रीततारा
कधी नाव डळमळे ही
कधी हरपला किनारा
|
॥
१
॥
|
कोई दिल का खेल देखे
कि मुहब्बतों की बाज़ी
वो क़दम क़दम पे जीते
मैं क़दम क़दम पे हारा
|
कोणी मनचा खेळ पाहा
प्रीतीचा डावही हा
जिंके पदोपदी ती
जो पदोपदी मी हारला
|
॥
२
॥
|
ये हमारी बदनसीबी
जो नहीं तो और क्या है
कि उसी के हो गये हम
जो न हो सका हमारा
|
ही माझी बदनशीबी
नाहीतर आणखी काय आहे
की तिचाच जाहलो मी
जी न माझी होऊ शकली
|
॥
३
॥
|
पड़े जब ग़मों के पाले
रहे मिटके मिटनेवाले
जिसे मौत भी न पूछा
उसे ज़िंदगी ने मारा
|
जेव्हा दुःखाशी गाठ पडली
जे होणार, नष्ट झाले
ना विचारी मृत्यू ज्याला
त्याला जीवनाने छळले
|