२०२०-०९-०७

गीतानुवाद-१५८: तसवीर तेरी दिल में

मूळ हिंदी गीतकारः मजरूह, संगीतकारः सलील चौधरी, गायकः लता, रफी
चित्रपटः माया, सालः १९६१, भूमिकाः देव आनंद, माला सिन्हा 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००७०७२०


धृ

लता:
तसवीर तेरी दिल में
जिस दिन से उतारी है
फिरूँ तुझे संग लेके
नये नये रंग लेके
सपनों की महफ़िल में
रफ़ी:
तसवीर तेरी दिल में
जिस दिन से उतारी है
फिरूँ तुझे संग लेके
नये नये रंग लेके
सपनों की महफ़िल में

लता:
तसवीर तुझी हृदयी
उतरली जेव्हापासून
फिरू तुला संग घेऊन
नवे नवे रंग घेऊन
स्वप्नांच्या दरबारी
रफ़ी:
तसवीर तुझी हृदयी
उतरली जेव्हापासून
फिरू तुला संग घेऊन
नवे नवे रंग घेऊन
स्वप्नांच्या दरबारी



लता:
माथे की बिंदिया तू है सनम
नैनों का कजरा पिया तेरा ग़म
नैन के नीचे नीचे
रहूँ तेरे पीछे पीछे
चलूं किसी मंज़िल में

लताः
भाळीची टिकली तू आहेस प्रिया
डोळ्यांतील काजळ दुःख तुझे ना
दृष्टीसमोर राहू तुझ्या
पाठी पाठी राहू तुझ्या
चलू ईप्सितापाठी



रफ़ी:
तुमसे नज़र जब गयी है मिल
जहाँ है कदम तेरे, वहीं मेरा दिल
झुके जहाँ पलकें तेरी
खुले जहाँ ज़ुल्फ़ें तेरी
रहूँ उसी मंज़िल में

रफीः
तुझ्यातच नजर, जेव्हा ही गुंतली
असशी तू प्रिये जिथे, तिथे तिथे मी
तुझी दृष्टी जेथे पडे
तुझे केस होती खुले
राहू त्याच जागी मी

 

रफ़ी, लता:
तसवीर तेरी दिल में
जिस दिन से उतारी है

लता, रफ़ी:
तसवीर तुझी हृदयी
उतरली जेव्हापासून

https://www.youtube.com/watch?v=D7bv55_bdjs

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.