२०२३-०८-१६

गीतानुवाद-२७९: इब्तिदा-ए-इश्क़ में हम सारी रात जागे

मूळ हिंदी गीतः हसरत जयपुरी, शैलेंद्र; संगीतकारः शंकर- जयकिशन, गायकः मुकेश, लता
चित्रपटः हरियाली और रास्ता, सालः १९६२, भूमिकाः माला सिन्हा, मनोजकुमार 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२३०७२७

धृ

इब्तिदा-ए-इश्क़ में हम सारी रात जागे
अल्ला जाने क्या होगा आगे
मौला जाने क्या होगा आगे
दिल में तेरी उलफ़त के बंधने लगे धागे

प्रेमारंभ फक्त होता, सारी रात्र जागे
देवच जाणे पुढे काय घडते ते ते
ज्योतिष जाणे पुढे काय घडते ते ते
अंतरात प्रीतीचे जडती का हे धागे

क्या कहूँ कुछ कहाँ नहीं जाए
बिन कहे भी रहा नहीं जाए
रात-रात भर करवट मैं बदलूँ
दर्द दिल का सहा नहीं जाए
नींद मेरी आँखों से दूर-दूर भागे

बोलू काय काही सांगवत नाही
बोलल्यावाचून राहवत नाही
रात्रभर कुशी मी बदलल्या
विरहव्यथा हि सोसवत नाही
डोळ्यांतून झोपही का दूर दूर पळते

दिल में जागी प्रीत की ज्वाला
जबसे मैंने होश सम्भाला
मैं हूँ तेरे प्यार की सीमा
तू मेरा राही मतवाला
मेरे मन की बीना में तेरे राग जागे

ज्योत प्रीतीची मनात उजळे
जेव्हापासून यौवन कळले
मी तर तुझ्या प्रीतीची सीमा
सोबती बरा तूही तर माझा
अंतरीच्या वीणेवर, गीत तुझे येते

तूने जब से आँख मिलाई
दिल से इक आवाज़ ये आई
चल के अब तारों में रहेंगे
प्यार के हम तो हैं सौदाई
मुझको तेरी सूरत भी चाँद रात लागे

जेव्हापासून नजर जुळवलीस
मनातूनी एक साद आली
चल आता तार्‍यांतच राहू
प्रेमाचे आम्ही व्यवहारी
मुखही मज तुझे आता चंद्रमाच भासे