गीतानुवाद-११३: पंख होते तो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-११३: पंख होते तो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०१८-०७-०६

गीतानुवाद-११३: पंख होते तो उड आती

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००४०६२५

 


धृ

पंख होते तो उड आती रे
रसिया ओ जालिमा
तुझे दिल का दाग दिखलाती रे

पंख लावून उडत येते रे
रसिका ए निर्ममा
ऐकवते हृदिचे तुज सल रे 



यादों में खोयी पहुँची गगन में
पंछी बन के सच्ची लगन में
दूर से देखा मौसम हसी था
आनेवाले तूही नही था

विचारी हरपून आकाशी गेले
खर्‍या खगाची ओढ ल्याले
ऋतू हिरवा तो दृष्टिस आला
येणारा परि तूच नव्हतास



किरने बन के बाहे फैलायी
आस के बादल पे जाके लहरायी
झूल चुकी मैं वादे का झूला
तू तो अपना वादा ही भूला

झाले किरण मी, बाहू पसरे
अंतराळी आशेच्या विहरले
वचनांच्या झुल्यांवर झुलले
विसरलास तू आपली वचने

 

 https://www.youtube.com/watch?v=kwI01TWbkfA