२०२३-०२-१४

गीतानुवाद-२६८: Although we hail from different lands

Lyricist: Unknown, Musician: Shankar Jaikishan, Singer: Mohd Rafi
Film Name: Non-Filmi, Year: 1970 

 

Lyricist: Unknown
१९७०

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२२०१२४

धृ

Although we hail from different lands
we share one earth and sky and sun
remember friends, the world is one

निराळ्या असू प्रदेशांतील
भूमि, नभ एकची, रवी एक
स्मरा मित्रांनो जग हे एक

We want all enmity to seize
for we want peace, we all want peace
we want no hate, we want no strife
since we were born for love and life
come let us chant while joining hands
we shall not rest till wars are done
remember friends, the world is one

जगी शत्रुत्व संपू दे
हवी शांती, जगा शांती
नसो हेवा, नसो संघर्ष
प्रेम करण्या इथे हरेक
गाऊ या मंत्र सोबत या
न सरता युद्ध नसू कुणी एक
स्मरा मित्रांनो जग हे एक

we have matured to dream and build
we want our dreams to be fulfilled
we have come here to dream and plan
a world of joy and hope for man
a world is dignity demesne
a world that we shall see begun
remember friends, the world is one

स्वप्न पाहू नि साकारू
स्वप्न पूरी करू सर्वही
ती पाहण्या नि योजण्या
मानवा सुख नि आशाही
जग सन्मान उपवनीचा
जगदोद्भव बघू सारे 
स्मरा मित्रांनो जग हे एक

 

’बहारो फूल बरसाओ’ https://youtu.be/IMk9oVh1r6c

गाण्याच्या चालीवरले महंमद रफी यांनी गायिलेले आणि शंकर जयकिसन यांनी संगीत दिलेले अनोळखी इंग्रजी गाणे, दिनेश शिंदे यांनी लक्षात आणून दिले. https://www.youtube.com/watch?v=kLaol19qaig

त्याचा हा मराठी अनुवाद.

 

वा! सुंदर दिनेशदा. फारच सुंदर अर्थाचे गाणे आज तुम्ही लक्षात आणून दिले आहेत.

२०२३-०२-१२

गीतानुवाद-२६७: अपनी धुन में रहता हूँ

 


 

मूळ हिंदी गीतः नासिर काझमी

 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२३०२१२

 

धृ

अपनी धुन में रहता हूँ
मैं भी तेरे जैसा हूँ
ओ पिछली रुत के साथी
अब के बरस मैं तन्हा हूँ

तंद्रितच मी राहत रे
तुझ्यासमानच मीहि रे
मित्रा गेल्या ऋतुतील रे
एकटाच मी यंदा रे

तेरी गली में सारा दिन
दुख के कंकर चुनता हूँ
मुझ से आँख मिलाये कौन
मैं तेरा आईना हूँ

गल्लीतच तव सारा दिस
दुःखखडे मी वेचत रे 
दृष्टीस दृष्टि कोण करे
मी तर तव प्रतिबिंबच रे

मेरा दिया जलाये कौन
मैं तेरा ख़ाली कमरा हूँ
तू जीवन की भरी गली
मैं जंगल का रस्ता हूँ

उजळावा मम दीप कुणी
मी घर वेड्या तुझेच रे
गजबजगल्ली जीवनी तू
मी तर रस्ता जंगली रे

अपनी लहर है अपना रोग
दरिया हूँ और प्यासा हूँ
आती रुत मुझे रोयेगी
जाती रुत का झोंका हूँ

आपली मर्जी, आपला र्‍हास
तहानला मी समुद्र रे
येता ऋतू मजवर रडतो
गतऋतूचा मी झोका रे