गीतानुवाद-३०२: प्यार हुआ इक़रार हुआ है लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गीतानुवाद-३०२: प्यार हुआ इक़रार हुआ है लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२०२४-१२-२७

गीतानुवाद-३०२: प्यार हुआ, इक़रार हुआ है

मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः शंकर जयकिसन, गायकः लता, मन्ना डे
चित्रपटः श्री ४२१०, सालः १९५५, भूमिकाः राज कपूर, नर्गीस, नादिरा 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२४१२१६


धृ

प्यार हुआ, इक़रार हुआ है
प्यार से फिर क्यूँ डरता है दिल?
कहता है दिल, "रस्ता मुश्किल
मालूम नहीं है कहाँ मंज़िल"

प्रेम झाले, मंजूर झाले
तरी मन का त्याला घाबरते?  
म्हणते हे मन, “रस्ता आहे कठीण”
माहीत नाही कुठे आहे ईप्सित”

कहो कि अपनी प्रीत का
गीत ना बदलेगा कभी
तुम भी कहो, "इस राह का
मीत ना बदलेगा कभी"
प्यार जो टूटा, साथ जो टूटा,
चाँद ना चमकेगा कभी

बोल तू आपल्या प्रीतीचे
गीत न मुळि बदलेल कधी
बोल तू ही, “या वाटेची
साथ न मुळि बदलेल कधी”
प्रेम मोडता, साथ सोडता,
चंद्र पुन्हा न दिसेल कधी

रातें दसों दिशाओं से
कहेंगी अपनी कहानियाँ
गीत हमारे प्यार के
दोहराएँगी जवानियाँ
मैं ना रहूँगी, तुम ना रहोगे,
फिर भी रहेंगी निशानियाँ

रात्री दहा दिशांतूनी
आपापल्या वदतील कथा
गीत आमच्या प्रीतीचे
गातील पुन्हा नव्या पिढ्या
राहीन मी ना, राहशील तू ना
राहतील तरिही याच खुणा