मूळ हिंदी गीतः भरत व्यास, संगीतः वसंत देसाई, गायकः मन्ना डे,
चित्रपटः तूफान और दिया, १९५६,
भूमिकाः राजेंद्रकुमार, नंदा
मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००६०४२९
॥धृ॥
|
निर्बल से लडाई बलवान की
ये कहानी है दिये की और तूफ़ान की
|
दुर्बळाशी ही लढाई बलवानाची
ही कथा आहे दिव्याची, वादळाची ही
|
॥१॥
|
इक रात अन्धियारी, थी दिशाये कारी-कारी
मन्द-मन्द पवन था, चल रहा
अन्धियारे को मिटाने, जग में ज्योत जगाने
एक छोटा सा दिया था, कही जल रहा
अपनी धुन में मगन, उसके तन में अगन
उसकी लौ में लगन भगवान की
|
एक रात्र होती काळी, सार्या दिशांत काजळी
मंद मंद वारा होता तेथे वाहत
अंधःकार संपवाया, जगा ज्योतीने उजळाया
कुठेतरी होता दिवा एक तेवत
होता निमग्न स्वतःत, धग त्याचे अंतरात ज्योतीमध्ये भक्ती त्याच्या ईश्वराची की |
॥२॥
|
कही दूर था तूफ़ान, दिये से था बलवान
सारे जग को मसलने, मचल रहा
झाड हो या पहाड, दे वह पल में उखाड
सोच-सोच के ज़मीन पे, था उछल रहा
एक नन्हा सा दिया, उसने हमला किया
अब देखो लिला विधि के विधान की
|
दूर होते ते वादळ, होते दिव्याहून थोर
येत होते ते जगाला उधळून टाकण्या
झाड असो वा पहाड, देऊ क्षणात पछाड
ह्या विचारे भुईवर देत ढोसण्या
एक छोटासा दिवा, बोले त्याचेवर धावा विधीलिखिताची लीला पाहा न्यारी ही
|
॥३॥
|
दुनिया ने साथ छोडा, ममता ने मुख मोडा
अब दिये पे ये दुख पडने लगा
पर हिम्मत न हार, मन में मरन विचार
अत्याचार की हवा से लडने लगा
सर उठाना या झुकाना, या भलाई में मर जाना
घडी आयी उसके भी इम्तेहान की
|
साथ जगाने सोडली, पाठ मायेने दाविली
मग दिव्यावर दुःख लागे कोसळू
मुळीधीर न सोडता, मृत्यूविचारा परतविता अत्याचाराच्या हवेशी लागे तो लढू
ताठ मान, वा झुकवून, जावे मृत्यूशी झुंजून
येई क्षण आता त्याच्या परीक्षेचाही
|
॥४॥
|
फिर ऐसी घडी आयी, घनघोर घटा छायी
अब दिये का भी दिल लगा कांपने
बडे ज़ोर से तूफ़ान, आया भरत उडान
उस छोटे से दिये का बल मापने
तब दिया दुखियारा, वह बिचारा बेसहारा
चला दाव पे लगाने, बाजी प्राण की
|
मग वेळ अशी आली, बाजू बाजू झाकोळली
लागे दिव्याचे काळीजही मग धडधडू
मोठ्या वेगाने वादळ, आले भरात उडत
पाहे दिव्याच्या बळाचे माप ते घेऊ
तेव्हा दिवा दुखलेला, असहाय्य तो बिचारा
पाही प्राणपणाने झुंजूनही
|
॥५॥
|
लडते-लडते वह थका, फिर भी बुझ न सका
उसकी ज्योत में था बल रे सच्चाई
का
चाहे था वह कमजोर, पर टूटी नही डोर
उसने बिडा था उठाया रे भलाई का
हुवा नही वह निराश, चली जब तक सांस
उसे आस थी प्रभु के वरदान की
|
झुंज देऊनी थकला, मात्र तरीही न विझला
सच्चाईची शक्ती त्याच्या ज्योतीत रे
जरी शक्तीहीन झाला, तरी धैर्य ना हारला
होता विडा उचलला, भलाईचा रे
झाला नाही तो निराश, जोपर्यंत चाले श्वास
आशा त्याला होती ईश्वरी कृपेची ती
|
॥६॥
|
सर पटक-पटक, पग झटक-झटक
न हटा पाया दिये को अपनी आन से
बार-बार वार कर, अंत में हार कर
तूफ़ान भागा रे मैदान से
अत्याचार से उभर, जली ज्योत अमर
रही अमर निशानी बलिदान की
|
डोईफोड बहू करी, लत्ताप्रहारही वरी
निश्चयातुनी दिव्याला न ढळवू शके
वारंवार करुनी वार, जाई शेवटाला हार
मैदानाला सोडून वादळ ते पळे
अत्याचारही साहून, ज्योत जळे चिरंतन
बलिदानाची ठरली सदोदित स्मृती ती
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.