मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः सचिनदेव बर्मन, गायकः रफी
चित्रपटः काला बाजार, सालः १९६९, भूमिकाः देव आनंद, वहिदा रेहमान
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२००६२५
॥ धृ ॥
|
खोया खोया चाँद खुला आसमान आँखों में सारी रात जाएगी तुम को भी कैसे नींद आएगी
|
न ये चंद्रमा खुले आसमान न्याहळतच सारी रात जाईल ही तुला तरी कैसी झोप येईल ती
|
॥ १ ॥
|
मस्ती भरी हवा जो चली खिल खिल गई यह दिल की कली मन की गली में है खलबली कि उनको तो बुलाओ
|
मस्तीभरी हवा चालली खुलली कशी ही मनाची कळी मनपंथी काय खळबळ झाली की तिला तर बोलाव
|
॥ २ ॥
|
तारे चले नजारें चले संग संग मेरे वो सारे चले चारों तरफ़ इशारे चले किसी के तो हो जाओ
|
तारे आले नजारे आले सोबत माझ्या हे सारे आले चहूबाजूंना इशारे झाले कुणाची तर तू हो ना
|
॥ ३ ॥
|
ऐसी ही रात भीगी सी रात हाथों में हाथ होते वह साथ कह लेते उन से दिल की यह बात अब, तो न सताओ
|
अशीच ही रात, भिजलेली रात हातात हात, असता ती साथ सांगू तिला का, मनची मी बात नको आणखी सतावू
|
॥ ४ ॥
|
हम मिट चले जिन के लिए बिन कुछ कहे वह चुप चुप रहे कोई ज़रा यह उन से कहे न ऐसे आज़माओ
|
झुरतो असा जिच्यासाठी मी अबोलच अशी, ती चुप का बसे कोणी तिला, सांगा की हे न अशी पारख मला तू
|
https://www.youtube.com/watch?v=MDDVLE7HV10
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.