२०२०-०८-२७

गीतानुवाद-१४७: सब कुछ सिखा हमने

मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः शंकर जयकिसन, गायकः मुकेश
चित्रपटः अनाडी, सालः १९५९, भूमिकाः राजकपूर, नूतन

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६०८२५ 

॥
धृ
॥

सब कुछ सिखा हमने, ना सिखी होशियारी
सच है दुनियावालों, के हम है अनाडी

सगळंच शिकलो जरी मी, न शिकली चतुराई
खरं तर जगवाल्यांनो, मी आहेच अडाणी

॥
१
॥

दुनिया ने कितना समझाया
कौन है अपना, कौन पराया
फिर भी दिल की चोट छुपाकर
हमने आपका दिल बहलाया
खुद ही मर मिटने की ये जिद है हमारी
सच है दुनियावालों, के हम है अनाडी

दुनियेने ह्या किती समजावले
कोण आपले ते, कोण ते परके
लपवून तरीही घाव हृदीचे
तुजसी मी नेहमीच रिझविले
स्वतःस वाहून घेण्याची, जिद्दच होती माझी
खरं तर जगवाल्यांनो, मी आहेच अडाणी

॥
२
॥

असली नकली चेहरे देखे
दिल पे सौ सौ पहरे देखे
मेरे दुखते दिल से पुछो
क्या क्या ख्वाब सुनहरे देखे
टूटा जिस तारे पे नजर थी हमारी
सच है दुनियावालों, के हम है अनाडी

असली नकली चेहरे दिसले
हृदयी पहारे शंभर दिसले
दुखर्‍या मम हृदयास विचारा
सोनेरी किती दिसली स्वप्ने
तुटला तो तारा, जो अवलोकीत होतो मी
खरं तर जगवाल्यांनो, मी आहेच अडाणी

॥
३
॥

दिल का चमन उजडते देखा
प्यार का रंग उतरते देखा
हमने हर जीने वाले को
धन दौलत पे मरते देखा
दिल पे मरने वाले मरेंगे भिखारी
सच है दुनियावालों, के हम है अनाडी

भग्न हृदय होतांना दिसले
प्रेमरंग उडतांना दिसले
जगणारे सारेची मजला
दौलतीवर जिव टाकत दिसले
जिवास जिव देणारे, परि मरती भिकारी
खरं तर जगवाल्यांनो, मी आहेच अडाणी

 https://www.youtube.com/watch?v=OLZoBJxlQBA

२०२०-०८-२०

गीतानुवाद-१४६: न ये चाँद होगा न तारें रहेंगे

गीतकार: एस. एच. बिहारी, संगीतकार: हेमंत कुमार, गायक: हेमंत कुमार, गीता दत्त
चित्रपट: शर्त, सालः १९५४, भूमिकाः शामा, दीपक, शशीकला 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१७०७२२

॥
धृ
॥

न ये चाँद होगा, न तारे रहेंगे
मगर हम हमेशा, तुम्हारे रहेंगे

 

न हा चंद्र राहील, न त्या तारकाही
तरी होउनी मी, तुझा नित्य राहीन

॥
१
॥

बिछड़कर चले जाए तुम से कहीं
तो ये ना समझना मोहब्बत नहीं
जहाँ भी रहे हम तुम्हारे रहेंगे

जरी तवविना वेगळा जाहलो मी
तु समजू नको की मला प्रीत नाही
कुठेही असो मी, तुझा नित्य राहीन

॥
२
॥

जमाना अगर कुछ कहे भी तो क्या
मगर तुम न कहना हमें बेवफा
तुम्हारे लिये हैं, तुम्हारे रहेंगे

जगाने जरी बोलले काहिही तरि
नको तू कृतघ्न म्हणू मज कधीही
तुझाची असे मी, तुझा नित्य राहीन

॥
३
॥

ये होगा सितम हमने पहले ना जाना
बना भी ना था, जल गया आशियाना
कहा अब मोहब्बत के मारे रहेंगे

अपराध होईल आधी न कळले
वसले न घर ते जळून खाक झाले
कुठे राहु आता, आम्ही प्रेमवेडे  

॥
४
॥

नज़र ढूँढती थी जिसे पा लिया है
उम्मीदों के फूलों से दामन भरा है
ये दिन हमको सब दिन से प्यारे रहेंगे

जया शोधले मी तया पावले रे
असे पूर्ण आशेनि मन भारलेले
असे दीस हे नेहमी प्रीय होतील

॥
५
॥

कहूँ क्या मेरे दिल का अर्मान क्या है
तुम्हें हर घड़ी चूमना चाहता है
कहाँ तक भला जी को मारे रहेंगे

कसे सांगु माझे मनी काय आहे
तुला सारखे चुंबु मज वाटते रे
कधी पावतो राहु मन मारुनी ते

॥
६
॥

सहारा मिले जो तुम्हारी हँसी का
भुला देंगे हम सारा ग़म ज़िन्दगी का
तुम्हारे लिये हैं तुम्हारे रहेंगे

मिळे सोबतीला, तुझे हास्य ते जर
तरी दुःख सारे, न राहील पळभर
तुझीची असे मी, तुझी नित्य राहीन

https://www.youtube.com/watch?v=4embLJ-pTRE

 

२०२०-०८-१७

गीतानुवाद-१४५: जब चली ठण्डी हवा

 मूळ हिंदी गीतः शकील, संगीतः रवी, गायक: आशा
चित्रपटः दो बदन, सालः १९६६, भूमिकाः आशा पारेख, मनोज कुमार

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०८१५ 

॥
धृ
॥

जब चली ठण्डी हवा
जब उठी काली घटा
मुझको ऐ जान-ए-वफ़ा
तुम याद आए

झुळुक येता गार गार
स्वच्छ होता नभ अपार
जिवलगा माझ्या मला
तुझी याद आली

॥
१
॥

ज़िंदगी की दास्तां
चाहे कितनी हो हंसीं
बिन तुम्हारे कुछ नहीं
बिन तुम्हारे कुछ नहीं
क्या मज़ा आता सनम
आज भूलेसे कहीं
तुम भी आजाते यहीं
तुम भी आजाते यहीं
ये बहारें ये फ़िज़ा
देखकर ओ दिलरुबा
जाने क्या दिल को हुआ
तुम याद आये

जीवनाची ही कथा
सुरस किती असली तरी
तुजविना पण व्यर्थ ही
तुजविना पण व्यर्थ ही
किती मजा येईल बघ
जर चुकुन येशी इथे
तू ही येशील जर इथे
तू ही येशील जर इथे
ही बहार अन् हा ऋतू
पाहूनी हे साजणा
काय झाले ना कळे
तुझी याद आली

॥
२
॥

ये नज़ारे ये समा
और फिर इतने जवाँ
हाये रे ये मस्तियाँ
हाये रे ये मस्तियाँ
ऐसा लगता हैं मुझे
जैसे तुम नज़दीक हो
इस चमन से जान-ए-जां
इस चमन से जान-ए-जां
सुन के प्रीतिकी सदा
दिल धड़कता हैं मेरा
आज पहलेसे सिवा
तुम याद आए

देखावे रंगतही ही
सारे हे इतके युवा
हाय रे धुंदीत या
हाय रे धुंदीत या
ऐसे वाटे रे मला
जवळी तू असशी जणू
जिवलगा ह्या उपवनी
जिवलगा ह्या उपवनी
ऐकूनी प्रीतीगुजा
मन माझे स्पंदे इथे
आधीपासूनच आणि
तुझी याद आली

 


२०२०-०८-११

स्तोत्रानुवाद-०५: निर्वाणषट्क

 निर्वाणषट्क – मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२००८१२

 

॥
१
॥

मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं
न च श्रोत्रजिव्हे न च घ्राणनेत्रे
न च व्योमभूमिर्न तेजो न वायु:
चिदानंदरूप: शिवोऽहम् शिवोऽहम्

न बुद्धि,  नसे ’मी’ पणा, चित्त ना मी
न ज्ञानेंद्रिये, ना मना व्यक्तवे मी
न आकाश, भूमी, न दिप्ती, न वायू
असे ज्ञानतोषी, खरा मी, पुरा मी

॥
२
॥

न च प्राणसंज्ञो न वै पंचवायु
र्न वा सप्तधातुर्न वा पंचकोश:
न वाक् पाणिपादौ न चोपस्थपायू
चिदानंदरुप: शिवोऽहम् शिवोऽहम्

नसे पंचवायू, न मी पंचप्राण
नसे सप्तधातू, न मी पंचकोश
न वाणी, नसे हातपायादि अंगे
असे ज्ञानतोषी, खरा मी, पुरा मी

॥
३
॥

न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ
मदो नैव मे नैव मात्सर्यभाव:
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष:
चिदानंदरुप: शिवोऽहम् शिवोऽहम्

न मी द्वेष, प्रीती, न मी लोभ, इच्छा
न मी गर्व, हेवा कधीही नसे मी
न मी धर्म, ना अर्थ, कांक्षा, न मोक्ष
असे ज्ञानतोषी, खरा मी, पुरा मी

॥
४
॥

न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं
न मंत्रो न तिर्थं न वेदा न यज्ञा:
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता
चिदानंदरुप: शिवोऽहम् शिवोऽहम्

नसे पुण्य, पापे, न सौख्ये न दुःखे
नसे मंत्र, तीर्थ, नसे वेद, यज्ञे
न मी भोजने, भोज्य, भोक्ता नसे मी
असे ज्ञानतोषी, खरा मी, पुरा मी

॥
५
॥

न मे मृत्यशंका न मे जातिभेद:
पिता नैव मे नैव माता न जन्म
न बंधुर्न मित्रं गुरूर्नेव शिष्य:
चिदानंदरुप: शिवोऽहम् शिवोऽहम्

न मी मृत्युभीती, न मी जातिभेद
पिता ना, न माता, नसे जन्मही मी
न भाऊ, सखा ना, गुरू ना, न शिष्य
असे ज्ञानतोषी, खरा मी, पुरा मी

॥
६
॥

अहं निर्विकल्पो निराकाररूपो
विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंन्द्रियाणाम्
सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंध:
चिदानंदरुप: शिवोऽहम् शिवोऽहम्

असे निर्विकल्पा, निराकाररूपा
असे व्यापुनी सर्वही इंद्रिया मी
असे साम्य मी, मुक्ति ना बंधने मी
असे ज्ञानतोषी, खरा मी, पुरा मी

 

इतिश्री आद्य शंकराचार्य विरचितं
निर्वाणषट्क स्तोत्रं संपूर्णम्

अशाप्रकारे आदी शंकराचार्य विरचित
’निर्वाणषटक’ संपूर्ण होत आहे

 

https://www.youtube.com/watch?v=kDw1Gd6_C9M

https://anuvad-ranjan.blogspot.com/2020/08/blog-post_11.html

२०२०-०७-२६

गीतानुवाद-१४३: सुहाना सफर और ये मौसम हसीं


मूळ हिंदी गीतः शैलेन्द्र, संगीतः सलील चौधरी, गायकः मुकेश
चित्रपटः मधुमती, सालः १९५८, भूमिकाः दिलीपकुमार, वैजयंतीमाला

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२००७२५

॥
धृ
॥
सुहाना सफर और ये मौसम हंसीं
हमें डर है, हम खो न, जाएं कहीं

हवासा सफर, साजरा हा ऋतू
असा का मला, पाहतो मोहवू
॥
१
॥
ये कौन हँसता है फूलों में छूप कर
बहार बेचैन है किसकी धुन पर
कहीं गुमगुम, कहीं रुमझुम
के जैसे नाचे ज़मीं

हे कोण हसते आहे फूलांत हरवून
बहार अस्वस्थ कोणात गुंतून
कुठे गुपचूप, कुठे रुमझुम
जणु ही नाचे जमीन
॥
२
॥
ये गोरी नदियों का चलना उछलकर
के जैसे अल्हड़ चले पी से मिलकर
प्यारे प्यारे ये नज़ारे
निखरे हैं हर कहीं

नदी उसळत ही, चाले अशी का
प्रियासोबत ही अल्लड पळे का
हवे हवेसे, हे नजारे
उजळलेले इथे
॥
३
॥
वो आसमाँ झुक रहा है ज़मीं पर
ये मिलन हमने देखा यहीं पर
मेरी दुनिया, मेरे सपने
मिलेंगे शायद यहीं

हे झुकते आकाश जणु या भुईवर
हे मिलन पाहिले मी इथेच तर
माझी दुनिया, माझी स्वप्ने
बहुधा मिळतील इथेच