मूळ हिंदी
गीतः शैलेंद्र, संगीतः
शंकर जयकिसन, गायकः
मुकेश
चित्रपटः अनाडी, सालः १९५९, भूमिकाः
राजकपूर, नूतन
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६०८२५
॥ धृ ॥
|
सब कुछ सिखा हमने, ना सिखी होशियारी सच है दुनियावालों, के हम है अनाडी
|
सगळंच शिकलो जरी मी, न शिकली चतुराई खरं तर जगवाल्यांनो, मी आहेच अडाणी
|
॥ १ ॥
|
दुनिया ने कितना समझाया कौन है अपना, कौन पराया फिर भी दिल की चोट छुपाकर हमने आपका दिल बहलाया खुद ही मर मिटने की ये जिद है हमारी सच है दुनियावालों, के हम है अनाडी
|
दुनियेने ह्या किती समजावले कोण आपले ते, कोण ते परके लपवून तरीही घाव हृदीचे तुजसी मी नेहमीच रिझविले स्वतःस वाहून घेण्याची, जिद्दच होती माझी खरं तर जगवाल्यांनो, मी आहेच अडाणी
|
॥ २ ॥
|
असली नकली चेहरे देखे दिल पे सौ सौ पहरे देखे मेरे दुखते दिल से पुछो क्या क्या ख्वाब सुनहरे देखे टूटा जिस तारे पे नजर थी हमारी सच है दुनियावालों, के हम है अनाडी
|
असली नकली चेहरे दिसले हृदयी पहारे शंभर दिसले दुखर्या मम हृदयास विचारा सोनेरी किती दिसली स्वप्ने तुटला तो तारा, जो अवलोकीत होतो मी खरं तर जगवाल्यांनो, मी आहेच अडाणी
|
॥ ३ ॥
|
दिल का चमन उजडते देखा प्यार का रंग उतरते देखा हमने हर जीने वाले को धन दौलत पे मरते देखा दिल पे मरने वाले मरेंगे भिखारी सच है दुनियावालों, के हम है अनाडी
|
भग्न हृदय होतांना दिसले प्रेमरंग उडतांना दिसले जगणारे सारेची मजला दौलतीवर जिव टाकत दिसले जिवास जिव देणारे, परि मरती भिकारी खरं तर जगवाल्यांनो, मी आहेच अडाणी
|
https://www.youtube.com/watch?v=OLZoBJxlQBA
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.