२०२०-०८-२०

गीतानुवाद-१४६: न ये चाँद होगा न तारें रहेंगे

गीतकार: एस. एच. बिहारी, संगीतकार: हेमंत कुमार, गायक: हेमंत कुमार, गीता दत्त
चित्रपट: शर्त, सालः १९५४, भूमिकाः शामा, दीपक, शशीकला 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१७०७२२


धृ

न ये चाँद होगा, न तारे रहेंगे
मगर हम हमेशा, तुम्हारे रहेंगे

 

न हा चंद्र राहील, त्या तारकाही
तरी होउनी मी, तुझा नित्य राहीन



बिछड़कर चले जाए तुम से कहीं
तो ये ना समझना मोहब्बत नहीं
जहाँ भी रहे हम तुम्हारे रहेंगे

जरी तवविना वेगळा जाहलो मी
तु समजू नको की मला प्रीत नाही
कुठेही असो मी, तुझा नित्य राहीन



जमाना अगर कुछ कहे भी तो क्या
मगर तुम न कहना हमें बेवफा
तुम्हारे लिये हैं, तुम्हारे रहेंगे

जगाने जरी बोलले काहिही तरि
नको तू कृतघ्न म्हणू मज कधीही
तुझाची असे मी, तुझा नित्य राहीन



ये होगा सितम हमने पहले ना जाना
बना भी ना था, जल गया आशियाना
कहा अब मोहब्बत के मारे रहेंगे

अपराध होईल आधी न कळले
वसले न घर ते जळून खाक झाले
कुठे राहु आता, आम्ही प्रेमवेडे  



नज़र ढूँढती थी जिसे पा लिया है
उम्मीदों के फूलों से दामन भरा है
ये दिन हमको सब दिन से प्यारे रहेंगे

जया शोधले मी तया पावले रे
असे पूर्ण आशेनि मन भारलेले
असे दीस हे नेहमी प्रीय होतील



कहूँ क्या मेरे दिल का अर्मान क्या है
तुम्हें हर घड़ी चूमना चाहता है
कहाँ तक भला जी को मारे रहेंगे

कसे सांगु माझे मनी काय आहे
तुला सारखे चुंबु मज वाटते रे
कधी पावतो राहु मन मारुनी ते



सहारा मिले जो तुम्हारी हँसी का
भुला देंगे हम सारा ग़म ज़िन्दगी का
तुम्हारे लिये हैं तुम्हारे रहेंगे

मिळे सोबतीला, तुझे हास्य ते जर
तरी दुःख सारे, न राहील पळभर
तुझीची असे मी, तुझी नित्य राहीन

https://www.youtube.com/watch?v=4embLJ-pTRE

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.