निर्वाणषट्क
– मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२००८१२
॥
१
॥
|
मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिव्हे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायु: चिदानंदरूप: शिवोऽहम् शिवोऽहम्
|
न बुद्धि, नसे ’मी’ पणा, चित्त ना मी न ज्ञानेंद्रिये, ना मना व्यक्तवे मी न आकाश, भूमी, न दिप्ती, न वायू असे ज्ञानतोषी, खरा मी, पुरा मी
|
॥
२
॥
|
न च प्राणसंज्ञो न वै पंचवायु र्न वा सप्तधातुर्न वा पंचकोश: न वाक् पाणिपादौ न चोपस्थपायू चिदानंदरुप: शिवोऽहम्
शिवोऽहम्
|
नसे पंचवायू, न मी पंचप्राण नसे सप्तधातू, न मी पंचकोश न वाणी, नसे हातपायादि अंगे असे ज्ञानतोषी, खरा मी, पुरा मी
|
॥
३
॥
|
न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभाव: न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष: चिदानंदरुप: शिवोऽहम्
शिवोऽहम्
|
न मी द्वेष, प्रीती, न मी लोभ, इच्छा न मी गर्व, हेवा कधीही नसे मी न मी धर्म, ना अर्थ, कांक्षा, न मोक्ष असे ज्ञानतोषी, खरा मी, पुरा मी
|
॥
४
॥
|
न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मंत्रो न तिर्थं न वेदा न यज्ञा: अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानंदरुप: शिवोऽहम् शिवोऽहम्
|
नसे पुण्य, पापे, न सौख्ये न दुःखे नसे मंत्र, तीर्थ, नसे वेद, यज्ञे न मी भोजने, भोज्य, भोक्ता नसे मी असे ज्ञानतोषी, खरा मी, पुरा मी
|
॥
५
॥
|
न मे मृत्यशंका न मे जातिभेद: पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधुर्न मित्रं गुरूर्नेव शिष्य: चिदानंदरुप: शिवोऽहम् शिवोऽहम्
|
न मी मृत्युभीती, न मी जातिभेद पिता ना, न माता, नसे जन्मही मी न भाऊ, सखा ना, गुरू ना, न शिष्य असे ज्ञानतोषी, खरा मी, पुरा मी
|
॥
६
॥
|
अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंन्द्रियाणाम् सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंध: चिदानंदरुप: शिवोऽहम् शिवोऽहम्
|
असे निर्विकल्पा, निराकाररूपा असे व्यापुनी सर्वही इंद्रिया मी असे साम्य मी, मुक्ति ना बंधने मी असे ज्ञानतोषी, खरा मी, पुरा मी
|
|
इतिश्री आद्य शंकराचार्य विरचितं निर्वाणषट्क स्तोत्रं
संपूर्णम्
|
अशाप्रकारे आदी शंकराचार्य विरचित ’निर्वाणषटक’ संपूर्ण होत आहे
|
https://www.youtube.com/watch?v=kDw1Gd6_C9M
https://anuvad-ranjan.blogspot.com/2020/08/blog-post_11.html
२ टिप्पण्या:
प्रिय नरेंद्र,
तुझी चतुरस्र प्रतिभा पाहून तुझा मित्र असल्याचा सार्थ अभिमान आहे! ही तुला देवदत्त देणगीच म्हणावी लागेल. असेच लिहित जा व आमच्या सारख्याना सहज ज्ञानानन्द देत जात जा .तुला खुप खुप शुभेच्छा व अभिनन्दन!
तुझा
मकरंद
प्रिय मकरंद,
आठवणीत गेलेल्या दिवसांतील मित्र अवचितच भेटावा, त्याने सुंदर अभिप्राय लिहावा, अभिनंदन करावे हे हवेहवेसे वाटणारेच आहे. ज्या मोकळ्या मनाने तुझ्या सहज स्फुरलेल्या भावना तू इथे व्यक्त केल्या आहेस त्याखातर मी कृतज्ञ आहे. निर्वाणषटक हे खरे तर आत्म्याचेच वर्ण आहे. आत्मषटक म्हणतात ह्याला. काही दिवसांपूर्वी जर मला कुणी विचारले असते की, ह्याचा अनुवाद करावा का? तर मी नाहीच म्हणालो असतो. एका दिवशी मात्र मला सोपे शब्द सुचू लागले आणि अनुवाद उदयास आला. अनेकांना आवडला ही तर फारच आनंदाची गोष्ट आहे.
असेच वाचत राहा. आस्वाद घेत राहा. सूचनाही केल्या तर मला मार्गदर्शकच ठरतील!
तुझा स्नेहांकित
नरेंद्र गोळे २०२००८१५
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.