२०२०-०८-१७

गीतानुवाद-१४५: जब चली ठण्डी हवा

 मूळ हिंदी गीतः शकील, संगीतः रवी, गायक: आशा
चित्रपटः दो बदन, सालः १९६६, भूमिकाः आशा पारेख, मनोज कुमार

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०८१५ 


धृ

जब चली ठण्डी हवा
जब उठी काली घटा
मुझको जान--वफ़ा
तुम याद आए

झुळुक येता गार गार
स्वच्छ होता नभ अपार
जिवलगा माझ्या मला
तुझी याद आली



ज़िंदगी की दास्तां
चाहे कितनी हो हंसीं
बिन तुम्हारे कुछ नहीं
बिन तुम्हारे कुछ नहीं
क्या मज़ा आता सनम
आज भूलेसे कहीं
तुम भी आजाते यहीं
तुम भी आजाते यहीं
ये बहारें ये फ़िज़ा
देखकर दिलरुबा
जाने क्या दिल को हुआ
तुम याद आये

जीवनाची ही कथा
सुरस किती असली तरी
तुजविना पण व्यर्थ ही
तुजविना पण व्यर्थ ही
किती मजा येईल बघ
जर चुकुन येशी इथे
तू ही येशील जर इथे
तू ही येशील जर इथे
ही बहार अन् हा ऋतू
पाहूनी हे साजणा
काय झाले ना कळे
तुझी याद आली



ये नज़ारे ये समा
और फिर इतने जवाँ
हाये रे ये मस्तियाँ
हाये रे ये मस्तियाँ
ऐसा लगता हैं मुझे
जैसे तुम नज़दीक हो
इस चमन से जान--जां
इस चमन से जान--जां
सुन के प्रीतिकी सदा
दिल धड़कता हैं मेरा
आज पहलेसे सिवा
तुम याद आए

देखावे रंगतही ही
सारे हे इतके युवा
हाय रे धुंदीत या
हाय रे धुंदीत या
ऐसे वाटे रे मला
जवळी तू असशी जणू
जिवलगा ह्या उपवनी
जिवलगा ह्या उपवनी
ऐकूनी प्रीतीगुजा
मन माझे स्पंदे इथे
आधीपासूनच आणि
तुझी याद आली

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.