२०२६-१०-२०

गीतानुवाद-३४३: गुमसुम सा ये जहाँ

मूळ हिंदी गीतः राजेंद्र कृष्ण, संगीतः हेमंतकुमार, गायकः गीता दत्त, हेमंतकुमार
चित्रपटः दुनिया झुकती है, सालः १९६०, भूमिकाः शामा, सुनील दत्त 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२६१०१८

धृ

गुम सुम सा ये जहाँ, ये रात ये हवा
एक साथ आज दो, दिल धड़केंगे दिलरुबा

गुपचुप हे सारे जग, ही रात्र ही हवा
एक साथ आज दो, मिळतील बघ मने इथे

१

  देखो वो चाँद बदली की ओट में छुपने लगा
ये नील गगन भी, प्यार के आगे झुकने लगा
कितनी हसीन कितनी शरीर है चाँद की ये अदा

पाहा चंद्र हा, ढगाआड इथे, लपू लागला
हे नील गगनही, प्रेमापुढे का, झुकू लागले
किती सुंदर ही, किती ही प्रिय, चंद्राची ही लकब

२

उल्फत में चूर, दुनिया से दूर, हम आ ही गये
मंजिल के पास, अब तो हुजूर, हम आ ही गये
चाहत के फूल, देखे ना धूल, डाली से ना हो जुदा

आपसात चूर, जगापासून दूर, आम्ही आलोच
गंतव्याशी इथे, आता प्रिये, आम्ही आलोच
आवडीचे फूल, पाहो न धूळ, खुडले न जावो ते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.