मूळ
हिंदी गीतः शैलेन्द्र, संगीतः सलील चौधरी, गायकः मुकेश
चित्रपटः मधुमती,
सालः १९५८, भूमिकाः दिलीपकुमार, वैजयंतीमाला
मराठी
अनुवादः नरेंद्र गोळे २०२००७२५
॥
धृ
॥
|
सुहाना सफर और ये मौसम हंसीं
हमें डर है, हम खो
न, जाएं कहीं
|
हवासा सफर, साजरा हा ऋतू
असा का मला, पाहतो मोहवू
|
॥
१
॥
|
ये कौन हँसता है फूलों में छूप कर
बहार बेचैन है किसकी धुन पर
कहीं गुमगुम, कहीं रुमझुम
के जैसे नाचे ज़मीं
|
हे कोण हसते आहे फूलांत हरवून
बहार अस्वस्थ कोणात गुंतून
कुठे गुपचूप, कुठे रुमझुम
जणु ही नाचे जमीन
|
॥
२
॥
|
ये गोरी नदियों का चलना उछलकर
के जैसे अल्हड़ चले पी से मिलकर
प्यारे प्यारे ये नज़ारे
निखरे हैं हर कहीं
|
नदी उसळत ही, चाले अशी का
प्रियासोबत ही अल्लड पळे का
हवे हवेसे, हे नजारे
उजळलेले इथे
|
॥
३
॥
|
वो आसमाँ झुक रहा है ज़मीं पर
ये मिलन हमने देखा यहीं पर
मेरी दुनिया, मेरे सपने
मिलेंगे शायद यहीं
|
हे झुकते आकाश जणु या भुईवर
हे मिलन पाहिले मी इथेच तर
माझी दुनिया, माझी स्वप्ने
बहुधा मिळतील इथेच
|
1 टिप्पणी:
छानच झालाय अनुवाद!
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.