२०१६-०४-०६

गीतानुवाद-०७४ः कहीं दीप जले कहीं दिल

मूळ हिंदी गीतः शकील, संगीतः हेमंत, गायीक: लता
चित्रपटः बीस साल बाद, सालः १९६२, भूमिका विश्वजीत, वहिदा रहेमान

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८११०६

धृ
कहीं दीप जले कहीं दिल
ज़रा देख ले आ कर परवाने
तेरी कौन सी है मंज़िल
कहीं दीप जले कहीं दिल
कुठे दीप जळे कुठे प्रीत
येऊन जरा बघ तू पतंगा
तुझे कोणते आहे ईप्सित
कुठे दीप जळे कुठे प्रीत

१
मेरा गीत तेरे दिल की पुकार है
जहाँ मैं हूँ वहीं तेरा प्यार है
मेरा दिल है तेरी महफ़िल
माझे गीत तुझ्या प्रीतीची आस आहे
जिथे मी आहे तिथेच तुझी प्रीत आहे
माझे मन आहे मैफिल तुझीच

२
ना मैं सपना हूँ ना कोई राज़ हूँ
एक दर्द भरी आवाज़ हूँ
पिया देर न कर, आ मिल
ना मी स्वप्न कुठले ना मी गूढ आहे
मी तर आर्त असा एक सूर आहे
प्रिया भेट, न कर तू उशीर

३
दुश्मन हैं हज़ारों यहाँ जान के
ज़रा मिलना नज़र पहचान के
कई रूप में हैं क़ातिल
शत्रू इथे जीवाचे हजारो
ओळखून नजर तू भेट
किती रूपांत काळ वसे





२०१६-०४-०३

गीतानुवाद-०७३ः ले के पहला पहला प्यार

गीतकार: मजरुह सुलतानपुरी, संगीतकार: ओ. पी. नय्यर, गायक: आशा, रफी, शमशाद बेगम
चित्रपट: सी. आय. डी., सालः १९५६, भूमिकाः देव आनंद, कल्पना कार्तिक

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१६०४०३


॥
धृ
॥
ले के पहला पहला प्यार
भर के आँखों में खुमार
जादूनगरी से आया हैं, कोई जादूगर
घेऊन पहिली पहिली प्रीत
तेजही डोळ्यातून मिरवीत
जादूनगरीतून आला आहे कोणी जादूगार

॥
१
॥
मुखड़े पे डाले हुये, जुल्फों की बदली
चली बलखाती कहा, रुक जाओ पगली
नैनोवाली तेरे द्वार,
ले के सपने हज़ार
जादूनगरी से आया हैं, कोई जादूगर
चेहर्‍यावर ओढून घेऊन, केसांचे ढग हे
लचकत निघालीस कुठे, थांब जरा ग खुळे
नेत्रावती तव दारात,
घेऊन स्वप्ने हजारात
जादूनगरीतून, आला आहे, कोणी जादूगार

॥
२
॥
चाहे कोई चमके जी, चाहे कोई बरसे
बचना हैं मुश्किल, पिया जादूगर से
देगा ऐसा मंतर मार,
आख़िर होगी तेरी हार
जादूनगरी से आया हैं, कोई जादूगर
हवे त्यास चमकू दे, हवे त्यास बरसू दे
जादुतून प्रियाच्या, कठीण आहे सुटणे
मंत्र टाकिल, घालत वार,
होईल शेवटी तुझीच हार
जादूनगरीतून, आला आहे, कोणी जादूगार

॥
३
॥
सुन सुन बाते तेरी गोरी मुसकाई रे
आई आई देखो देखो, आई हँसी आई रे
खेलें होंठों पे बहार,
निकला गुस्से से भी प्यार
जादूनगरी से आया हैं, कोई जादूगर
ऐकून तव गूज पाहा, तिची कळी खुलली रे
आले आले आले रे, ओठी हसू आले रे
विहरे ओठांवरती बहार,
फुलतो रागातून अनुराग
जादूनगरीतून, आला आहे, कोणी जादूगार





२०१६-०३-२४

गीतानुवाद-०७२: वक्तने किया क्या हसीं सितम

वक्तने किया क्या हसीं सितम
मूळ हिंदी गीतः कैफ़ी आझमी, संगीतः सचिनदेव बर्मन, गायिकाः गीता दत्त
चित्रपटः कागझ के फूल, सालः १९५९
, भूमिकाः गुरूदत्त, वहिदा रहेमान
॥धृ॥
वक्तने किया क्या हसीं सितम
तुम रहे न तुम, हम रहे न हम
किती आवडिचा त्रास, काळ देतसे
तू न राहिलास तू, मी न मीही राहिले
॥१॥
बेकरार दिल इस तरह मिले
जिस तरह कभी हम जुदा न थे
अधीर मने पहा, भेटती अशी
जणू कधी न ती, राहली
सुटी
॥२॥
तुमभी खो गये, हमभी खो गये
एक राहपर चलके दो कदम
तूही हरपलास, मीही हरवले
क्रमून एक वाट, दोन पावले
॥३॥
जायेंगे कहां सुझता नही
चल पडे मगर रास्ता नही
जायचे कुठे, ते न मुळी सुचे
चाललो पुढे, नच वाट सापडे
॥४॥
क्या तलाश है कुछ पता नही
बुन रहे है दिन, ख्वाब दम-ब-दम
काय शोधतो, माहितही नसे
स्वप्न विणत दिस, श्वास एक एक

२०१६-०३-२०

गीतानुवाद-०७१: कभी तनहाईयों में यूँ

मूळ हिंदी गीतकार: किदार शर्मा, गायक: मुबारक बेग़म, संगीत स्नेहल भाटकर (बी.वासुदेव)
चित्रपटः हमारी याद आयेगी, सालः १९६१, भूमिकाः तनुजा

॥
धृ
॥
कभी तनहाईयों में यूँ
हमारी याद आयेगी
अंधेरे छा रहे होंगे
के बिजली कौंध जायेगी

कधी सय येईलही माझी
तुला असता तू एकांती
अंधेरही दाटुनी येईल
कोसळेल वीजही वर ती

॥
१
॥
ये बिजली राख कर जायेगी
तेरे प्यार की दुनिया
न फिर तू जी सकेगा
और न तुझको मौत आयेगी

ही बिजली भस्म करून टाकेल
तुझिया प्रेमाची दुनिया
न मग जगूही न शकशील तू
आणि न तुज मृत्यूही येईल


२०१६-०३-१३

गीतानुवाद-०७०: हम को मन की शक्ती देना

मूळ हिंदी गीतः गुलजार (संपूर्णसिंह कालरा), संगीतः वसंत देसाई, गायिकाः वाणी जयराम
चित्रपटः गुड्डी, सालः १९७१, भूमिकाः धर्मेंद्र, जया भादुरी


॥
धृ
॥
हम को मन की शक्ति देना, मन विजय करे
दूसरों की जय से पहले, खुद को जय करे
दे आम्हास शक्ती तू, मनास जिंकू दे
जिंकण्या कुणा आधी, स्वतःस जिंकू दे



॥
१
॥
भेदभाव अपने दिल से साफ़ कर सके
दोस्तों से भूल हो तो माफ़ कर सके
झूठ से बचे रहे, सच का दम भरे
दूसरों की जय से पहले, खुद को जय करे
भेदभाव अंतरीचा दूर करू शकू
चुके कुणी सुहृद, तया माफ करू शकू
सत्य करू समर्थ, मिथ्य दूर राखू दे
जिंकण्या कुणा आधी, स्वतःस जिंकू दे



॥
२
॥
मुश्किलें पड़े तो हम पे, इतना कर्म कर
साथ दे तो धर्म का, चले तो धर्म कर
खुद पे हौसला रहे, बदी से ना डरे
दूसरों की जय से पहले, खुद को जय करे
संकटात तू आम्हास शक्ती अशी दे
धर्मसंग राहू दे, आचरूही धर्म दे
वाईटास ना भिऊ, आम्हास धैर्य दे
जिंकण्या कुणा आधी, स्वतःस जिंकू दे

२०१६-०२-०८

गीतानुवाद-०६९ः ज़िंदा हूँ इस तरह

हिंदी गीतः बेहझाद लखनवी, संगीतः राम गांगुली, गायकः मुकेश
चित्रपटः आग, सालः १९४८, भूमिकाः राज कपूर, नर्गिस

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे

॥
धृ
॥

ज़िंदा हूँ इस तरह कि ग़म-ए-ज़िन्दगी नहीं
जलता हुआ दिया हूँ मगर रोशनी नहीं

जगतो असा मी, नाही मला, दुःख जीवनी
दिप पेटता मी, नाही तया, दीप्ति मुळिही
॥
१
॥

वो मुद्दतें हुईं हैं किसीसे जुदा हुए
लेकिन ये दिल कि आग अभी तक बुझी नहीं

किती काळ लोटला असे, होउन विलगही
धग अंतरातली न तरी, विझली अजुनही
॥
२
॥

आने को आ चुका था किनारा भी सामने
खुद उसके पास ही मेरी नैय्या गई नहीं

यावा तर, आलेला हा, किनारा समोरही
पण नाव मात्र माझी, तयापाशी न गेली
॥
३
॥

होंठों के पास आए हँसी, क्या मज़ाल है
दिल का मुआमला है कोई दिल्लगी नहीं

ओठांवर हसू येईल, तर काय आहे बिशाद
मनाचा हा मामला, न असे मस्करी मुळी

॥
४
॥
ये चाँद ये हवा ये फ़िज़ा, सब हैं मादमा
जब तू नहीं तो इन में कोई दिलकशी नहीं

हा चंद्र, ही हवा, ही बहार, सर्व धार्जिणे
नसता परंतु तू, निरस असे, सारे सारे हे