२०१६-०४-०३

गीतानुवाद-०७३ः ले के पहला पहला प्यार

गीतकार: मजरुह सुलतानपुरी, संगीतकार: ओ. पी. नय्यर, गायक: आशा, रफी, शमशाद बेगम
चित्रपट: सी. आय. डी., सालः १९५६, भूमिकाः देव आनंद, कल्पना कार्तिक

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१६०४०३



धृ
ले के पहला पहला प्यार
भर के आँखों में खुमार
जादूनगरी से आया हैं, कोई जादूगर
घेऊन पहिली पहिली प्रीत
तेजही डोळ्यातून मिरवीत
जादूनगरीतून आला आहे कोणी जादूगार



मुखड़े पे डाले हुये, जुल्फों की बदली
चली बलखाती कहा, रुक जाओ पगली
नैनोवाली तेरे द्वार,
ले के सपने हज़ार
जादूनगरी से आया हैं, कोई जादूगर
चेहर्‍यावर ओढून घेऊन, केसांचे ढग हे
लचकत निघालीस कुठे, थांब जरा ग खुळे
नेत्रावती तव दारात,
घेऊन स्वप्ने हजारात
जादूनगरीतून, आला आहे, कोणी जादूगार



चाहे कोई चमके जी, चाहे कोई बरसे
बचना हैं मुश्किल, पिया जादूगर से
देगा ऐसा मंतर मार,
आख़िर होगी तेरी हार
जादूनगरी से आया हैं, कोई जादूगर
हवे त्यास चमकू दे, हवे त्यास बरसू दे
जादुतून प्रियाच्या, कठीण आहे सुटणे
मंत्र टाकि, घालत वार,
होईल शेवटी तुझीच हार
जादूनगरीतून, आला आहे, कोणी जादूगार



सुन सुन बाते तेरी गोरी मुसकाई रे
आई आई देखो देखो, आई हँसी आई रे
खेलें होंठों पे बहार,
निकला गुस्से से भी प्यार
जादूनगरी से आया हैं, कोई जादूगर
कूतव गूज पाहा, तिची कळी खुलली रे
आले आले आले रे, ओठी हसू आले रे
विहरे ओठांवरती बहार,
फुलतो रागातून अनुराग
जादूनगरीतून, आला आहे, कोणी जादूगार





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.