२०१६-०४-०६

गीतानुवाद-०७४ः कहीं दीप जले कहीं दिल

मूळ हिंदी गीतः शकील, संगीतः हेमंत, गायीक: लता
चित्रपटः बीस साल बाद, सालः १९६२, भूमिका विश्वजीत, वहिदा रहेमान

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८११०६

धृ
कहीं दीप जले कहीं दिल
ज़रा देख ले आ कर परवाने
तेरी कौन सी है मंज़िल
कहीं दीप जले कहीं दिल
कुठे दीप जळे कुठे प्रीत
येऊन जरा बघ तू पतंगा
तुझे कोणते आहे ईप्सित
कुठे दीप जळे कुठे प्रीत

मेरा गीत तेरे दिल की पुकार है
जहाँ मैं हूँ वहीं तेरा प्यार है
मेरा दिल है तेरी महफ़िल
माझे गीत तुझ्या प्रीतीची आस आहे
जिथे मी आहे तिथेच तुझी प्रीत आहे
माझे मन आहे मैफिल तुझीच

ना मैं सपना हूँ ना कोई राज़ हूँ
एक दर्द भरी आवाज़ हूँ
पिया देर न कर, आ मिल
ना मी स्वप्न कुठले ना मी गूढ आहे
मी तर आर्त असा एक सूर आहे
प्रिया भेट, न कर तू उशीर

दुश्मन हैं हज़ारों यहाँ जान के
ज़रा मिलना नज़र पहचान के
कई रूप में हैं क़ातिल
शत्रू इथे जीवाचे हजारो
ओळखून नजर तू भेट
किती रूपांत काळ वसे





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.