वक्तने किया क्या हसीं सितम
मूळ
हिंदी गीतः कैफ़ी आझमी, संगीतः सचिनदेव बर्मन, गायिकाः गीता दत्त
चित्रपटः कागझ के फूल, सालः १९५९, भूमिकाः गुरूदत्त, वहिदा रहेमान
चित्रपटः कागझ के फूल, सालः १९५९, भूमिकाः गुरूदत्त, वहिदा रहेमान
॥धृ॥
|
वक्तने किया क्या हसीं सितम
तुम रहे न तुम, हम रहे न हम |
किती आवडिचा
त्रास, काळ देतसे
तू न राहिलास तू, मी न मीही राहिले |
॥१॥
|
बेकरार दिल इस तरह मिले
जिस तरह कभी हम जुदा न थे |
अधीर मने
पहा, भेटती अशी
जणू कधी न ती, राहली सुटी |
॥२॥
|
तुमभी खो गये, हमभी खो गये
एक राहपर चलके दो कदम |
तूही
हरपलास, मीही हरवले
क्रमून एक वाट, दोन पावले |
॥३॥
|
जायेंगे कहां सुझता नही
चल पडे मगर रास्ता नही |
जायचे
कुठे, ते न मुळी सुचे
चाललो पुढे, नच वाट सापडे |
॥४॥
|
क्या तलाश है कुछ पता नही
बुन रहे है दिन, ख्वाब दम-ब-दम |
काय शोधतो, माहितही नसे
स्वप्न विणत दिस, श्वास एक एक |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.