२०१६-०२-०८

गीतानुवाद-०६९ः ज़िंदा हूँ इस तरह

हिंदी गीतः बेहझाद लखनवी, संगीतः राम गांगुली, गायकः मुकेश
चित्रपटः आग, सालः १९४८, भूमिकाः राज कपूर, नर्गिस

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे

धृ

ज़िंदा हूँ इस तरह कि ग़म-ए-ज़िन्दगी नहीं
जलता हुआ दिया हूँ मगर रोशनी नहीं

जगतो असा मी, नाही मला, दुःख जीवनी
दिप पेटता मी, नाही तया, दीप्ति मुळिही

वो मुद्दतें हुईं हैं किसीसे जुदा हुए
लेकिन ये दिल कि आग अभी तक बुझी नहीं

किती काळ लोटला असे, होउन विलगही
धग अंतरातली न तरी, विझली अजुनही

आने को आ चुका था किनारा भी सामने
खुद उसके पास ही मेरी नैय्या गई नहीं

यावा तर, आलेला हा, किनारा समोरही
पण नाव मात्र माझी, तयापाशी न गेली

होंठों के पास आए हँसी, क्या मज़ाल है
दिल का मुआमला है कोई दिल्लगी नहीं

ओठांवर हसू येईल, तर काय आहे बिशाद
मनाचा हा मामला, न असे मस्करी मुळी

ये चाँद ये हवा ये फ़िज़ा, सब हैं मादमा
जब तू नहीं तो इन में कोई दिलकशी नहीं

हा चंद्र, ही हवा, ही बहार, सर्व धार्जिणे
सता परंतु तू, निरस असे, सारे सारे हे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.