२०१६-०३-१३

गीतानुवाद-०७०: हम को मन की शक्ती देना

मूळ हिंदी गीतः गुलजार (संपूर्णसिंह कालरा), संगीतः वसंत देसाई, गायिकाः वाणी जयराम
चित्रपटः गुड्डी, सालः १९७१, भूमिकाः धर्मेंद्र, जया भादुरी



धृ
हम को मन की शक्ति देना, मन विजय करे
दूसरों की जय से पहले, खुद को जय करे
दे आम्हास शक्ती तू, मनास जिंकू दे
जिंकण्या कुणा आधी, स्वतःस जिंकू दे




भेदभाव अपने दिल से साफ़ कर सके
दोस्तों से भूल हो तो माफ़ कर सके
झूठ से बचे रहे, सच का दम भरे
दूसरों की जय से पहले, खुद को जय करे
भेदभाव अंतरीचा दूर करू शकू
चुके कुणी सुहृद, तया माफ करू शकू
सत्य करू समर्थ, मिथ्य दूर राखू दे
जिंकण्या कुणा आधी, स्वतःस जिंकू दे




मुश्किलें पड़े तो हम पे, इतना कर्म कर
साथ दे तो धर्म का, चले तो धर्म कर
खुद पे हौसला रहे, बदी से ना डरे
दूसरों की जय से पहले, खुद को जय करे
संकटात तू आम्हास शक्ती अशी दे
धर्मसंग राहू दे, आचरूही धर्म दे
वाईटास ना भिऊ, आम्हास धैर्य दे
जिंकण्या कुणा आधी, स्वतःस जिंकू दे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.