मूळ हिंदी गीतः कैफी आझमी, संगीतः मदन
मोहन, गायकः लता
चित्रपटः हीर-रांझा, सालः १९७०,
भूमिकाः प्रिया राजवंश, राजकुमार
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२२४०७०२
|
धृ
|
मिलो न तुम तो हम घबराये मिलो तो आँख चुराये हमें क्या हो गया है तुम्हीं को दिल का राज़
बतायें तुम्हीं से राज़ छुपायें हमें क्या हो गया
है
|
न भेटशी तर जीव घाबरे भेटता नजरा चुकवे मला झाले तरी काय रहस्य मनिचे तुला सांगते गूज तुलाच न सांगे मला झाले तरी काय
|
|
१
|
ओ भोले साथिया देखे जो शोखी तेरे प्यार
की आँचल में भर ली हमने सारी बहारें संसार की नयी अदा से हम इठलायें पायी खुशी लुटायें हमें क्या हो गया
है
|
रे भोळ्या साजणा नादही पाहून तुझ्या प्रेमाचा पदरी घेतली भरून मी सारी बहारच या जगातली नवा भाव घेऊन हरखले उधळे खुशी मिळाली मला झाले तरी काय
|
|
२
|
रूठे कभी कभी मान गये बातें तुम्हारी हम जान
गये ऐसी अदायें क़ुरबान गये तुम्हें मनाये दिल
बहलायें क्या क्या नाज़ उठायें हमें क्या हो गया
है
|
कधी रुसले कधी जरी मानले म्हणणे सारे तुझे जाणले प्रसन्न हरकतींवर मी झाले रुसवा काढे मना रंजवे काय काय न करे मला झाले तरी काय
|
|
३
|
ओ सोहने जोगिया रंग ले हमें भी इसी रंग
में फिर से सुना दे बंसी कलियाँ खिला दे गोरे अंग
में वही जो तानें आग लगाये उन्हीं से आग बुझाएं हमें क्या हो गया
है
|
ओ स्वर्णकेशरा रंगव मलाही या रंगाने पुन्हा ऐकव बांसरी कळ्या खुलव तू गोर्या अंगी रे तीच तान जी पेटवी वणवा तिनेच विझवू कसा रे मला झाले तरी काय
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.