मूळ हिंदी गीत: आनंद बक्षी, संगीत: रोशन, गायक: मुकेश
चित्रपट: देवर, सालः १९६६, भूमिका:
धर्मेंद्र, देवेन वर्मा, शर्मिला टागोर
मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००६१२०३
|
धृ
|
बहारों ने मेरा चमन लूटकर खिज़ां को ये इल्ज़ाम क्यों दे दिया किसीने चलो दुश्मनी की मगर इसे दोस्ती नाम क्यों दे दिया
|
बहारीने माझी फुले लाटली अकालावरी आळ अन् घेतला असो वैर केले कुणी पण तरी का नाव मैत्री हे त्याला दिले
|
|
१
|
मैं समझा नहीं ऐ मेरे हमनशीं सज़ा ये मिली है मुझे किस लिये के साक़ी ने लब से मेरे छीन कर किसी और को जाम क्यों दे दिया
|
न कळले मला हे समासक्तीके का ही सजा मज मिळाली असे कलालीणीनी माझ्या मुखीचा चषक काढून कोणास तो का दिला
|
|
२
|
मुझे क्या पता था कभी इश्क़ में रक़ीबों को कासिद बनाते नहीं खता हो गई मुझसे कासिद मेरे तेरे हाथ पैगाम क्यों दे दिया
|
प्रेमात, नव्हते मला ठाउकी निरोप्या न कधी कुणी प्रियाला करी अपराध माझाच झाला असा तुझ्या हाती संदेश मी धाडीला
|
|
३
|
खुदाया यहाँ तेरे इन्साफ़ के बहुत मैंने चर्चे सुने हैं मगर सज़ा की जगह एक खतावार को भला तूने ईनाम क्यों दे दिया
|
न्यायाच्या तुझिया इथे ईश्वरा मी ऐकल्या खूप चर्चा तरी शिक्षा म्हणून एका अपराध्यासी कशी बक्षिशी ईश्वरा तू दिली
|
रकीब = प्रतिस्पर्धी
कासिद = निरोप्या
हमनशीं = समासक्तिका, एकसारखी आसक्ती असलेली
साकी = कलालीण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.