२०२६-०६-१५

गीतानुवाद-३२९: दिल बेकरार सा है

मूळ हिंदी गीतः मजरूह सुलतानपुरी, संगीतः कल्याणजी आनंदजी, गायकः रफी, लता
चित्रपटः इशारा, सालः १९६४, भूमिकाः जॉय मुखर्जी, वैजयंतीमाला 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२६०६१५


धृ

दिल बेकरार सा है हमको खुमार सा है
जब से तुम्हे देखा सनम

मन अस्वस्थसे आहे मला धुंदशी एक आहे
तुला पाहिले जेव्हापासून

मौसम नशे मे चूर है
कुछ पी के आई है घटा
बस कुछ ना पुछो आज क्या
पैगाम लाई है घटा
अब मैने जाना प्यार क्या है
तेरी ज़ुल्फो की कसम

ऋतू धुंदला हा आहे
काहीतरी प्याली रात
विचारू नका आज काय
संदेश आणला आहे तिने
आता मी समजलो प्रीत काय आहे
तुझ्या केसांच्या शपथ

मतलब तो अब समझा हूं मैं
धड़कन भरी आवाज़ का
एहसान मेरे सर पे है तेरे निगाहें नाज़ का
अब मैने जाना प्यार क्या है
तेरी आंखों की कसम

अर्थ तर मी समजलो आता
तो स्पंदत्या या ध्वनीचा
उपकार मजवर आहे तुझ्या नजरेच्या प्रीतीचा
आता मी समजलो प्रीत काय आहे
तुझ्या डोळ्यांच्या शपथ

हाथो मे आँचल थाम के
ये सर झुकाने कि अदा
दीवाना कर देगी मुझे
यू मुस्कुराने की अदा
अब मैने जाना प्यार क्या है
तेरी होठो कि कसम

हातात घेऊन पदर
अधोवदनाची ही लकब
खुळेच करेल हे मला
तुझे स्मित करण्याचे कसब
आता मी समजलो प्रीत काय आहे
तुझ्या ओठांची शपथ

जब तक निगाहोंसे तेरी
दिल की मुलाकाते न थी
जी ने को जीते थे मगर
ये रंग ये बाते न थी
अब हमने जाना बात क्या है
इन निगाहों की कसम

जोवरती नेत्रांनी तुझ्या
मनचे न हितगूज होते
जगत तर होते तरी
हा रंग न रूप हे होते
आता मी समजले रूप काय आहे
तुझ्या डोळ्यांची शपथ

जितने हुए हमसे खफा
उतनेही तुम प्यारे हुये
हम तो इसी अंदाजपर बैठे है दिल हारे हुये
अब हमने जाना प्यार क्या है
इन अदाओं की कसम

जितका तू रुसलास रे
तितका तू आवडलास
मी तर याच लकबीवर हारून मन बैसले
आता मी समजले प्रीत काय आहे
तुझ्या लकबींची शपथ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.