मूळ हिंदी गीतः शकील बदायुनी, संगीतः
नौशाद, गायकः महम्मद रफी
चित्रपटः दिल दिया दर्द लिया, सालः १९६६,
भूमिकाः दिलीपकुमार, वहिदा रहमान
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२३१००४
|
धृ
|
दिलरुबा मैने तेरे प्यार
में क्या क्या ना किया दिल दिया दर्द लिया, दिल
दिया दर्द लिया कभी फूलों में गुजारी कभी
काटों में जिया दिल दिया दर्द लिया, दिल
दिया दर्द लिया
|
प्रियतमे ग मी तुझ्या प्रेमात काय
काय न केले हृदय माझे मी दिले, मिळवले दुःख निके कधी फुलांत विहरलो काट्यांत कधी मी जगलो हृदय माझे मी दिले, मिळवले दुःख निके
|
|
१
|
जिंदगी आज भी हैं, बेख़ुदी
आज भी हैं प्यार कहते हैं जिसे, वो
खुशी आज भी हैं मैने दिनरात मोहब्बत का,
तेरी जाम पिया दिल दिया दर्द लिया, दिल
दिया दर्द लिया
|
आयुष्य आजही आहे, धुंदी ती आजही आहे प्रेम म्हणतात ज्याला, ती खुशी आजही
आहे मी दिनरात तुझ्या प्रीतीचा, चषक
प्याला हृदय माझे मी दिले, मिळवले दुःख निके
|
|
२
|
क्या कहू तेरे लिये, मैने
आँसू भी पिये कभी खामोश रहा, कभी
शिकवे भी किये कर लिया चाक गिरेबान कभी
दामन को सिया दिल दिया दर्द लिया, दिल
दिया दर्द लिया
|
काय तुला मी सांगू, मी तर अश्रूही प्याले कधी मूकच झालो, कधी तक्रारही केली कधी झटकले कपडे कधी उसवले शिवले हृदय माझे मी दिले, मिळवले दुःख निके
|
|
३
|
प्यार की जान हैं तू दिल
का अरमान हैं तू कौन दुनियाँ से डरे, जब
निगेबान हैं तू अपनी कश्ती को सहारे पे
तेरे छोड़ दिया दिल दिया दर्द लिया, दिल
दिया दर्द लिया
|
प्रेमाचा प्राण आहेस तू मनची इच्छाच
आहेस तू कोण दुनियेला डरे, जोवर मेहेरेबान
आहेस तू माझ्या नावेला तुझ्या विश्वासावर
सोडले आहे हृदय माझे मी दिले, मिळवले दुःख निके
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.