मूळ मराठी गीतकारः अनिल भारती, संगीतः गजानन वाटवे, गायकः गजानन वाटवे
हिंदी अनुवाद: नरेंद्र गोळे २००७०३२८
|
धृ |
प्रीतीची आसवे पत्थरात पाझरली तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली |
पत्थ्थर में झर लिए प्रीती के आसू भी वो सलीम राजपुत्र, नर्तकी अनारकली |
|
१ |
अनोळखी शिपाईगड्या एकदाच पाहिले शूराच्या चरणावर मस्त हुस्न
वाहिले इष्काच्या दरबारी चांदरात बरसली तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली |
अन्जान इक सिपाही को देखा एकबार था शूर के चरण में तबही मस्त हुस्न झुक लिया वो सलीम राजपुत्र, नर्तकी अनारकली |
|
२ |
बंड करून उठली तलवार सलीमाची राजनिष्ठ, राजबीज आस मोंगलांची अकबरच्या न्यायकसोटीस प्रीत उतरली तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली |
कर बगावत उठी तरवार वो सलीम की राजनिष्ठ, राजबीज आस मोंगलों की अकबर के न्यायनिकष पर भी प्रीत कस ली वो सलीम राजपुत्र, नर्तकी अनारकली |
|
३ |
ते शराबी नयन कधी कुणा नाही डरले राजा वा रयतेला ना कधीच घाबरले मिलनाच्या वाटेवर भिंत जरी बांधली तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली |
वो शराबी नयन कभी डरे ना किसीसे राजा या रंक से वो कभीभी ना डरे मिलन की राह में दीवार क्यूँ न बाँध ली वो सलीम राजपुत्र, नर्तकी अनारकली |
|
४ |
अल्लाच्या दरबारी दोन पाखरे जुळी पंख मिटून मूकपणे चढली एका सुळी तो पतंग ती शमा एकसाथ जाळली तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली |
साथसाथ दो पंछी जुल्म को सहते रहे पर मिट के साथसाथ, सुलीपर भी चढ गये नामशेष वो पतंग, वो शमा भी रह गई वो सलीम राजपुत्र, नर्तकी अनारकली |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.