२०२६-०६-०९

गीतानुवाद-३२६: रंजिश ही सही

मूळ ऊर्दू गझलः अहमद फराज, गायकः मेहदी हसन, सालः १९७२

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२६०६०९

धृ

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिये आ
आ फिर से मुझे छोड के जाने के लिये आ

नाखुशीने का होईना मन मोडण्यास ये
पुन्हा मला सोडून जाण्यासाठी तरी ये

पहले से मरासिम न सही फिर भी कभी तू
रस्म-ओ-रहे दुनिया ही निभाने के लिये आ

पूर्वीचे न संबंध काही तरीही कधी तू
रिवाज निभावण्यास दुनियेचा तरी ये

किस किस को बतायेंगे जुदाई का सबब हम
तू मुझ से खफ़ा है तो ज़माने के लिये आ

कुणा कुणास सांगू मी विरहाची कारणे
मजवर तू नाराज, तर इतरांसाठी तरी ये

कुछ तो मेरे पिन्दार-ए-मुहब्बत का भरम रख
तू भी तो कभी मुझ को मनाने के लिये आ

काही तरी प्रेमाची माझ्या तू राख लाज ग
माझीही मनधरणी तू करण्यास कधी ये

एक उम्र से हूं लज़्ज़त-ए-गिरिया से भी मह्रूम
ऐ राहत-ए-जाँ मुझ को रुलाने के लिये आ

क्रंदनानंदापासूनही कधीचाच मी वंचित
हे मनोरमे तू मला रडवण्यास तरी ये

अब तक दिल-ए-खुष-फ़ेहम को हैं
तुझ से हैं उम्मीदें
ये आखरी शम्में भी बुझाने के लिये आ

आजवर समजदार मना
आशा आहे तुजकडून
या ज्योती अखेरच्याही विझवण्यास तरी ये

माना की मुहब्बत का छुपाना है मुहब्बत
चुपके से किसी रोज़ जताने के लिये आ

मानले की लपवणे प्रीतीस, खरी प्रीत
एखादे दिवस हळूच हे पटवण्यास तरी ये

जैसे तुम्हे आते हैं न आने के बहाने
ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिये आ

येतात बहाणे तुला, न येण्याचे नेहमी
कधीतरी तशीच तू, न परतण्यासाठी ये


रंजिश: अनिमोसिटी, शत्रुत्व, तिरस्कार

मरासिम: रिलेशनशिपसंबंध

रस्म-ओ-रहे दुनिया: रिवाज, मॅनर्स, ट्रडिशन्स ऑफ़ द वर्ल्ड

पिन्दार-ए-मुहब्बत: लव्हज प्राईड, प्रेमाची आबरू

लज़्ज़त-ए-गिरिया: जोय ओफ़ क्राईंग, क्रंदनानंद;

मह्रूम: डिव्हॉईड, वंचित;

राहत-ए-जाँ: कम्फ़ोर्ट ऑफ़ द सोउल, आत्मानंद, मनोरमे

दिल-ए-खुष-फ़ेहम: अंडरस्टँडिंग हार्ट, समजदार मन;

शम्में: लाईट्स, दिवे

बहाने: एक्स्क्युजेस, सबबी, बहाणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.