२०१८-०७-१४

गीतानुवाद-११६: कोई लौटा दे मेरे




मूळ हिंदी गीतकार: शैलेंद्र, संगीतः किशोरकुमार, गायक: किशोरकुमार
चित्रपटः दूर गगन की छाँव में, सालः १९६४, भूमिकाः किशोर, सुप्रिया चौधरी, अमित

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६१२२२

प्र
स्ता
अलबेले दिन प्यारे
मेरे बिछड़े साथ सहारे
हाय! कहाँ गये, हाय! कहाँ गये
आँखो के उजियारे
मेरे सूनी रात के तारे, हाय! कहाँ गये
खुशालीचे दिन आवडते
माझे हरपले संगसोबती
हाय! कुठे गेले, हाय! कुठे गेले
माझ्या नयनींचे तेज
सुन्या रात्रींचे सहारे, हाय! कुठे गेले

धृ
कोई लौटा दे मेरे, बीते हुए दिन
बीते हुए दिन वो मेरे, प्यारे पलछिन
कोणी परत करावे, हरपले दिन
हरपले दिन, ते माझे आवडते क्षण

मेरे ख्वाबों के महल, मेरे सपनों के नगर
पी लिया जिनके लिये, मैंने जीवन का ज़हर
आज मैं ढूँढूं कहाँ, खो गये जाने किधर
बीते हुए दिन वो हाय, प्यारे पलछिन
मनोरथांतील महाल आणि स्वप्नांतील नगर ज्यांच्यासाठी प्यायलो मी, जीवनाचे ते जहर
आज मी शोधू कुठे, कुठे गेले ते सारे
हरपले दिन, ते माझे आवडते क्षण

मैं अकेला तो न था, थे मेरे साथ कई
एक आँधी सी उठी, जो भी था लेके गई
ऐसे भी दिन थे कभी, मेरी दुनिया थी मेरी
बीते हुए दिन वो हाय, प्यारे पलछिन
एकटा मुळी नव्हतो, होते माझे संग किती
एक वादळसे आले, होते ते ते घेऊन गेले
असेही होते कधी दिन, माझे होते जग ते माझे
हरपले दिन, ते माझे आवडते क्षण



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.