२०१८-०७-०४

गीतानुवाद-११२: छू कर मेरे मनको


छू कर मेरे मनको

मूळ हिंदी गीतः अन्जान, संगीतः राजेश रोशन, गायकः किशोरकुमार
चित्रपटः याराना, सालः १९८१, कलाकारः अमिताभ बच्चन, नितू सिंग

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०७२४

धृ
छू कर, मेरे मन को
किया तूने, क्या इशारा
बदला ये मौसम
लगे प्यारा जग सारा

स्पर्शून हृदया ह्या
प्रिये केलेस काय इशारे
फिरला ऋतू सगळा
प्रिय भासे जग सारे

तू जो कहे जीवन भर
तेरे लिये मैं गाऊँ
तेरे लिये मैँ गाऊँ
गीत तेरे बोलों पे
लिखता चला जाऊँ
लिखता चला जाऊँ
मेरे गीतों में
तुझे ढूँढे जग सारा

म्हणशील जर तू तर
तुझ्यासाठी मी गाऊ
तुझ्यासाठी मी गाऊ
गीत तुझ्या बोलांवर
लिहीतच मी राहू
लिहीतच मी राहू
गीतांतून माझ्या
तुज शोधे जग सारे

आजा तेरा आँचल ये
प्यार से मैं भर दूँ
प्यार से मैं भर दूँ
खुशियाँ जहाँ भर की
तुझको नज़र कर दूँ
तुझको नज़र कर दूँ
तू ही मेरा जीवन
तू ही जीने का सहारा

ये तुझी ओटी मी
प्रेमाने भरून देऊ
प्रेमाने भरून देऊ
जगभरची खुशी तुजला
की मी बहाल करू
की मी बहाल करू
तूची माझे जीवन
जगण्या आधारच तू रे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.