२०१८-०७-०७

गीतानुवाद-११४: मेरा नाम राजू घराना अनाम


मेरा नाम राजू घराना अनाम

मूळ हिंदी गीतकार: शैलेंद्र, संगीतः शंकर-जयकिसन, गायक: मुकेश
चित्रपटः जिस देश में गंगा बहती है, १९६०, भूमिकाः राज कपूर, पद्मिनी, प्राण, ललिता पवार

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६१२१७


धृ

मेरा नाम राजू घराना अनाम  बहती है गंगा जहाँ मेरा धाम
माझे नाव राजू, घराणे अनाम वाहते ही गंगा, जिथे माझे धाम
काम नये नित गीत बनाना 
गीत बना के जहाँ को सुनाना
कोई न मिले तो अकेले में गाना
कविराज कहे, न ये ताज रहे
न ये राज रहे, न ये राजघराना
प्रीत और प्रीत का गीत रहे
कभी लूट सका न कोई ये खज़ाना
काम नवे नित्य, गीत रचणे
गीत रचूनी जगा ऐकविणे
भेटले न कोणी तर एकांतात गाणे
कविराज म्हणो, न मुकूट उरो
न हे राज्य उरो, न हे राजघराणे
प्रीत अन् प्रीतीचे गीत उरो
कधी लूटू शके ना कुणी हा खजिना

 
धूल का इक बादल अलबेला
निकला हूँ अपनी सफ़र में अकेला
छुप छुप देखूँ मैं दुनिया का मेला 
काहे मान करे, अभिमान करे
मेहमान तुझे इक दिन तो है जाना
डफ़ली उठा आवाज़ मिला
गा मिल के मेरे संग प्रेम तराना
धूळीचा एक ढग मी अलबेला
निघालो प्रवासा एकटा मी आपल्या
गुपचुप पाहतो मी दुनियेचा मेळा
का मान धरू, अभिमान धरू
जायचे तुला तर एक दिस पाहुण्या
डफली उचल, आवाज जुळव
गा माझे संग तू प्रेम तराणा



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.